निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत एका विवाहित महिला डॉक्टरने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉ. मनीषा निलेश जेजुरकर (Dr Manisha Jejurkar) असे मृत महिलेचे नाव असून, त्या स्वतः डॉक्टर असल्याने या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे. महिलेचे पती डॉ. निलेश जेजुरकर (Nilesh Jejurkar) हे नाशिक जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. पती-पत्नीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या कौटुंबिक वादातूनच डॉ. मनीषा जेजुरकर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी डॉ. निलेश जेजुरकर यांच्या विरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या भावाने निलेश जेजुरकर यांच्याबाबत गंभीर आरोप केलेत.
डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या भावाने एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, सहा तारखेला ही घटना घडली, त्या दिवशी बारा वाजेच्या सुमारास आम्हाला बहिणीच्या दिराचा फोन आला. त्यानंतर तिच्या सासर्यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला कळवले की, माझ्या बहिणीने आत्महत्या केली. आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो. ही आत्महत्या दिसत असली तरी आम्हाला शंका आहे की, तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
Nashik Crime News: निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ
ती कधीही आत्महत्या करू शकत नाही. तिला मी खूप वर्षांपासून ओळखतो. माझी बहीण तिच्या मुलींची, तिच्या नवऱ्याची किती काळजी घ्यायची हे सर्वांना माहिती होतं. त्यामुळे ती स्वतः आत्महत्या करणार नाही. यामागे खूप मोठा हात आहे. त्यामुळे आम्ही मुख्य आरोपी म्हणून निलेश जेजुरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निलेश जेजुरकर हे माझ्या बहिणीचा मानसिक छळ करत होते. ही एक दोन महिन्यांची गोष्ट नाही तर मागच्या दीड ते दोन वर्षांपासून हे सुरू होते. या घटनेमागचे मुख्य आरोपी निलेश जेजुरकरच आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
Nashik Crime News: माझ्या बहिणीला हीन दर्जाची वागणूक
पती-पत्नीमध्ये काही वाद होत होते का? याबाबत विचारले असता डॉ. मनीषा जेजुरकर यांचे भाऊ म्हणाले की, वाद एकाच बाजूने होत होते. माझ्या बहिणी सोबत राहणे त्यांना आवडत नव्हते. माझ्या बहिणीला ते हीन दर्जाची वागणूक द्यायचे. माणूस म्हणून सुद्धा त्यांनी तिला वागवले नाही. तिला तुच्छ लेखत होते. तिच्या शिक्षणाचा अवमान करत होते. त्या माणसाने 24 तासात माझ्या बहिणीशी पाच मिनिटे सुद्धा कधी बोलले नाही. माझ्या बहिणीने काही चौकशी केली तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे. घरातून बाहेर निघून जाणे, असे सुरू होते.
Nashik Crime News: आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण…
आम्ही त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तिची मनस्थिती खराब होत चालली आहे. तिला हे सहन होत नाही. तिला दीड दोन वर्षांपासून त्रास होत आहे. हे तिने तिच्या दिराला, सासू-सासर्यांना सांगितलं. ती नेहमी आग्रह धरत होती की, तुम्ही बसा, बोला,चर्चा करा. पण, त्यांनी तिला काहीच दाद दिली नाही. आम्ही तिच्या सासू-सासर्यांशी संपर्क साधला. त्यांना याबाबत सांगितले, तुम्ही काहीतरी मार्ग काढा, आपण चर्चा करू, जे काही वाद असतील ते आपण मिटवू, आसे म्हटले. पण, तिच्या घरच्यांनी शेवटपर्यंत मीटिंग होऊ दिली नाही, असा आरोप देखील डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या भावाने केलाय.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.