बीडचा कॉपी पॅटर्न, AIच्या माध्यमातून सामूहिक कॉपी; राज्यातील 81 शिक्षक निलंबित
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांदरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर प्रकारात सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर राज्यभरातील 81 शिक्षकांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेदरम्यान ChatGPT चा वापर करून सामूहिकरीत्या कॉपी करण्याचे प्रकार घडत होते. चौकशीत काही शिक्षक आणि विद्यार्थी संगनमताने या तंत्रज्ञानाचा गैरवापर करत असल्याचे समोर आले.
या प्रकरणात सर्वाधिक कारवाई बीड जिल्ह्यात झाली आहे. विशेषतः चोसाळा येथील परीक्षा केंद्रातील अनेक शिक्षक या गैरप्रकारात सहभागी असल्याचे तपासात उघड झाले आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी मंडळाने ही कठोर कारवाई केल्याचे सांगितले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चौकशी केल्यानंतर संबंधित शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध पुढील शिस्तभंगात्मक कारवाई देखील केली जाऊ शकते, अशी माहिती मंडळाने दिली.
Comments are closed.