राहा आणि रणबीर कपूरने आलिया भट्टला महिला दिनानिमित्त दिले गोंडस सरप्राईज – Tezzbuzz
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर तिचा पती रणबीर कपूर हा ही लोकप्रिय अभिनेता आहे. आणि या दोघांना एक गोड अशी मुलगी आहे तिचे नाव राहा आहे, तर काल आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रणबीर कपूर आणि राहा कपूरकडून अभिनेत्रीला हाताने बनवलेल कार्ड मिळाल आहे. आणि या कार्डचा फोटो आलिया भट्टने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.तर अभिनेत्रीने एका गोड कॅप्शनसह तिचा हा आनंद व्यक्त केला आहे.
रंगीत पेन, डूडल वापरून लहान रियाने तयार केलेल्या या गोंडस कार्डमध्ये आलियासाठी एक गोड संदेश आहे. दुमडलेल्या कागदाच्या एका बाजूला हृदय आणि तारेसह “मम्माला शुभेच्छा” असे लिहिले आहे, तर दुसऱ्या बाजूला लिहिले आहे, “पापा आणि राहाकडून महिला दिनाच्या शुभेच्छा”, दिल्या आहेत.
हे हृदयस्पर्शी आणि गोंडस कार्ड तिच्या फॉलोअर्ससाठी शेअर करताना, आलियाने या दिवसाचे महत्त्व स्पष्ट करणारी एक नोट देखील लिहिली. फोटोसोबत तिने लिहिले, “आपल्या मुलींना आपण स्वतःला ओळखणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि त्या कोण बनत आहेत हे साजरे करणे हे कदाचित सर्वात सुंदर शिकवण आहे याची एक गोड आठवण.”
आलिया भट्ट आणि रणबीर कापूरने (Kapoor)नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांची मुलगी राहाचे स्वागत केले. आलिया आणि रणबीर अनेकदा सोशल मीडियावर आणि मुलाखतींद्वारे पालक म्हणून त्यांच्या आयुष्यातील सुंदर क्षण शेअर करतात. मात्र, त्यांनी राहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
द केरळ स्टोरी 2 हा चित्रपट हिट झाला की फ्लॉप? घ्या जाणुन
Comments are closed.