चिरनेरच्या ‘हिंद टर्मिनल्स’मध्ये दोनशे परप्रांतीय कामगार घुसवले, भूमिपुत्रांना डावलले
चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या सीएफएसमध्ये ‘हिंद टर्मिनल्स’ सीएफएस कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना डावलून 200 परप्रांतीय कामगार घुसवले आहेत. भूमिपुत्रांना रोजगार देण्यास कंपनीच्या व्यवस्थापाने नकार दिल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी येत्या मंगळवारी कंपनीच्या विरोधात घडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात सर्वच पक्षांचे पदधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
चिरनेर येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीत ‘हिंद टर्मिनल्स’ सीएफएस कंपनीने सीएफएसची उभारणी केली आहे. या सीएफएसच्या उभारणीसाठी येथील सुमारे 40 शेतकऱ्यांच्या पिकल्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. जमिनी संपादन करताना शेतकऱ्यांना कंपनी व्यवस्थापनाने कंपनीतील ठेकेदारीची कंपनीच्या मनमानी कारभाराचा जाब विचारण्यासाठी चिरनेर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेलेल्या स्थानिक सर्वपक्षीय शिष्टमंडळाला कंपनीने स्थानिक एकही कामगार कामावर घेणार नसल्याची ठाम भूमिका जाहीर केली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी संतप्त झाले आहेत.
चिरनेरचे सरपंच भास्कर मोकल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, भाजपचे सुशांत पाटील, शेकापचे पूर्व विभाग सहचिटणीस सुरेश पाटील, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी यांनी येत्या मंगळवारी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामस्थांसह शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आले आहे. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाची पळापळ उडाली आहे.
कामे व प्रकल्पात नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात प्रकल्प सुरू झाल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाला स्थानिकांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला. कंपनी व्यवस्थापनाने स्थानिक भूमिपुत्रांना डावलून सुमारे 200 परप्रांतीय कामगारांची या युनिटमध्ये भरती केली आहे.
Comments are closed.