Israel Iran War – तुर्कीयेची युद्धात उडी; भूमध्य समुद्रात इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बुडवले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका, इस्रायल- इराण युद्धात आता तुर्कीयेने थेट प्रवेश केला आहे. तुर्कीयेने इराणविरुद्धच्या युद्धात उघडपणे प्रवेश केला आहे. याबाबतची माहिती तुर्कीयेच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी पूर्व भूमध्य समुद्रात इराणकडून डागण्यात आलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बुडवले आहे. तुर्कीने उत्तर सायप्रसमध्ये सहा एफ-१६ लढाऊ विमाने तैनात केली आहेत. तुर्कीयेने युद्धनौका नष्ट केली आणि भूमध्य समुद्रात इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बुजवले आहे. त्यामुळे या युद्धाची तीव्रता आणखी वाढली आहे.

तुर्कीयेने इराण युद्धात सक्रियपणे प्रवेश केला आहे. तुर्कीयेने पूर्व भूमध्य समुद्रात इराणकडून येणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाडले आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने इराणला इशारा दिला आहे की त्यांनी प्रदेशाच्या आणि नागरी लोकसंख्येच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी पावले उचलू नयेत. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, आम्ही आठवण करून देतो की या प्रकरणात तुर्कीच्या इशाऱ्यांकडे लक्ष देणे सर्वांच्या हिताचे आहे. तुर्कीला असलेल्या कोणत्याही धोक्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.

तुर्कीने उत्तर सायप्रसमध्ये युद्धनौकांचा मोठा ताफा तैनात केला होता. तुर्कीने उत्तर सायप्रसमध्ये सहा एफ-१६ लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण प्रणाली तैनात केल्या आहेत. आता, तुर्कीने इराणी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र नष्ट केले आहे. इराणने सायप्रसवर ड्रोनने हल्ला केल्यानंतर तुर्कीने ही पावले उचलली. तुर्की आणि सायप्रस हे शेजारी देश आहेत. उत्तर सायप्रस तुर्कीयेच्या नियंत्रणाखाली आहे. तुर्कीयेने उत्तर सायप्रसमध्ये F-16 विमाने तैनात केली आहेत. तुर्कीयेला इराण किंवा इराण समर्थक सैन्याकडून हल्ल्याची शक्यता वाटत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी, तुर्कीने इराणला त्यांच्या हवाई क्षेत्राजवळ कोणतेही क्षेपणास्त्र पडू देऊ नये असा इशारा दिला होता, परंतु इराणने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे दोघांमधील आरोप-प्रत्यारोप वाढले. यानंतर, तुर्कीने उत्तर सायप्रसमध्ये F-16 लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण प्रणाली तैनात केल्या. आता, जर उत्तर सायप्रसवर हल्ला झाला तर तुर्की निश्चितच प्रत्युत्तर देईल. अशा परिस्थितीत, संघर्ष पश्चिम आशियापासून पूर्व भूमध्य समुद्रापर्यंत पसरेल.

१ मार्च रोजी, इराण समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहने लेबनॉनमधून इराणी शाहेद-१३६ ड्रोन सोडले, ज्याने सायप्रसच्या दक्षिण भागात असलेल्या ब्रिटिश आरएएफ अक्रोटिरी हवाई तळावर हल्ला केला. शाहेद ड्रोनमुळे अनेक स्फोट झाले. युरोपियन युनियनचा सदस्य असलेल्या सायप्रसवर हा पहिला मोठा हल्ला होता. तुर्कीने याला “प्रादेशिक अस्थिरतेचा” पुरावा मानले. अमेरिका-इस्रायलींनी इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, संघर्ष पूर्व भूमध्य समुद्रात पसरला आहे. पूर्व भूमध्य समुद्रातील एक लहान बेट सायप्रस हा वादग्रस्त विषय बनला आहे. नाटो सदस्य आणि प्रामुख्याने सुन्नी देश असलेल्या तुर्कीची इराणशी (जो शिया बहुल आणि अमेरिका विरोधी आहे) आधीच वाद आहेत.

इराण आणि हिजबुल्लाहकडून ड्रोन/क्षेपणास्त्र धोक्याला प्रत्युत्तर म्हणून ग्रीसने दक्षिण सायप्रसमध्ये सैन्य तैनात केले आहे. सायप्रसच्या समर्थनार्थ ग्रीसने पाफोस हवाई तळावर चार एफ-१६ लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ४ मार्च रोजी ग्रीक एफ-१६ विमानांनीही दोन इराणी ड्रोन अडवून पाडले. याव्यतिरिक्त, ग्रीसने त्यांची सर्वात प्रगत युद्धनौका तैनात केली आहे.

Comments are closed.