रणदीप हुडा-लिन लैश्राम लवकरच आला-बाबा; मॅटर्निटी फोटोशूटचा फोटो व्हायरल – दैनिक बॉम्बबॉम्ब

अभिनेता रणदीप हुडा (Randeep Hudda) आणि लिन लैशराम लवकरच आई-बाबा होणार आहेत म्हणून ते खूप खुश देखील आहेत . या खास क्षणाचे त्यांनी सुंदर मॅटरनिटी फोटोशूट केले आहे. आणि त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

रणदीप हुडाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पत्नी लीनच्या मॅटरनिटी फोटोशूटचे अनेक गोड फोटो शेअर केले. या फोटोंपैकी बहुतेक फोटो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होते . तर काही फोटोंमध्ये लिन पोटावर हात ठेवून मायने बघत आहे तर रणदीप तिच्याकडे प्रेमाने पाहताना दिसतोय. काही फोटोंमध्ये लिन आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात हरवलेले दिसत असून चाहत्यांकडून या फोटोंवर भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त रणदीपने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्याने जंगलात बसलेला एक फोटो पोस्ट करत आपल्या कुटुंबात लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान लिनने हाआयुष्यातील सर्वात सुंदर बदल” असल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, आपल्या पोटात एका जीवाला वाढताना जाणवणे हा चमत्कारासारखा अनुभव आहे. त्यामुळे आई होण्याची खरी ताकद तिला समजली. याआधी तिने गर्भपाताचे दुःखही सहन केले असल्याचे सांगितल, मात्र आता ती खूप आनंदी असून बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘तारे जमीन पर’ अभिनेता दर्शील सफारीने साइन केला मोहित रैना आणि प्रियामणीसोबत नवीन चित्रपट

Comments are closed.