अभिनेता विजय आज पुन्हा सीबीआयसमोर हजर झाला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
करूर चेंगराचेंगरी प्रकरणात सीबीआयने अभिनेता आणि टीव्हीके प्रमुख विजय यांना मंगळवार, 10 मार्च रोजी पुढील चौकशीसाठी समन्स बजावले आहे. चौकशीला हजर राहण्यासाठी सीबीआय या तपास यंत्रणेने त्यांना एक नवीन नोटीस बजावली आहे. यापूर्वी 12 आणि 19 जानेवारी रोजी त्यांची चौकशी करण्यात आली होती. दोन्ही वेळा विजय यांची कसून चौकशी करण्यात आली होती. हे प्रकरण 27 सप्टेंबर 2025 रोजी करूरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीशी संबंधित असून त्यामध्ये 41 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 60 हून अधिक लोक जखमी झाले होते.
Comments are closed.