पुणे जिल्हा फुटबॉल संघटना सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026: फातिमा इलेव्हन, रेंजहिल्स यंग बॉईज एफसी आणि थंडरकॅट्झ एफसी संघ विजयी

पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत साखळी फेरीत फातिमा इलेव्हन, रेंजहिल्स यंग बॉईज एफसी, थंडरकॅट्झ एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.

बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत चुरशीच्या लढतीत यूकेएम कोथरूड एफसी संघाने न्यू इंडिया सॉकर क्लब संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले. यूकेएम कोथरूड एफसी संघाकडून शुभम भोसले(4मि), नीरज भट(58मि) यांनी प्रत्येकी एक गोल, तर न्यू इंडिया सॉकर क्लब संघाकडून सिद्धांत चव्हाण(10मि.), झेफनिया मिनेझिस(46 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात कृष्णा अहिर 14मि., जय महामुनी 57 मि.)यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर फातिमा इलेव्हन संघाने डेक्कन इलेव्हन अ संघाचा 2-1 असा पराभव करून आगेकूच केली.

अन्य लढतीत रेंजहिल्स यंग बॉईज एफसी संघाने  फिनिक्स स्पोर्ट्स अकादमी संघाचा 5-0 असा धुव्वा उडवला. विजयी संघाकडून शशांक यादव(2मि.),निशित हेगडे(7मि.), नील संघवी(17मि.), निखिल नारायणन(32मि.) आणि प्रितिश बाबर(25मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. थंडरकॅट्झ एफसी संघाने रिअल पुणे युनायटेड एफसी संघावर 2-0 असा एकतर्फी विजय मिळवला. थंडरकॅट्झ एफसी संघाकडून यश लोणेरे(22मि.) आणि शुभम राय(56मि.) यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

निकाल: साखळी फेरी: युकेएम कोथरूड एफसी: 2(शुभम भोसले 4मि., नीरज भट 58मि.) बरोबरी वि.न्यू इंडिया सॉकर क्लब: 2(सिद्धांत चव्हाण 10मि., झेफनिया मिनेझिस 46 मि.);

फातिमा इलेव्हन: 2(कृष्णा अहिर 14मि., जय महामुनी 57 मि.)वि.वि.डेक्कन इलेव्हन अ: 1(शिवराज देशमुख 42मि.);

रेंजहिल्स यंग बॉईज एफसी: 5 (शशांक यादव 2 मि., निशित हेगडे 7 मि., नील संघवी 17 मि., निखिल नारायणन 32 मि., प्रितिश बाबर 25 मि.) फिनिक्स स्पोर्ट्स अकादमी: 0;

थंडरकॅट्झ एफसी: 2(यश लोणेरे 22मि., शुभम राय 56मि.)वि.वि.रिअल पुणे युनायटेड एफसी: 0.

Comments are closed.