गडचिरोलीत आठ वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार, मामीने अंघोळ घालताना सुजलेलं पोट पाहिलं अन्…
गडचिरोली : रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळत असताना एका आठ वर्षीय चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीच्या (Gadchiroli Crime News) कोरची तालुक्यात समोर आला आहे. पाच दिवसांनी ही घटना समोर आली असून आरोपी मोनूकुमार ढेक याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी अनात असून मामा-मामी तिचा सांभाळ करतात. होळीच्या दिवशी आरोपीने मुलीला फुस लावून स्वतःच्या घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलीची मामी तिची आंघोळ करून देत असताना पाच दिवसानंतर हि बाब लक्षात आली तेव्हा मुलीने आपबिती सांगितली. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.(Gadchiroli Crime News)
रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळत असताना एका ८ वर्षीय चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार कोरची तालुक्यात (Gadchiroli Crime News)घडला. ही दुर्दैवी घटना तब्बल पाच दिवसांनी समोर आली असून, कोरची पोलिसांनी आरोपी मोनुकुमार ढेक (२२) या नराधमाला रविवार, ८ मार्च रोजी अटक केली आहे. पीडित चिमुरडी अनाथ असून, तिचा सांभाळ तिचे मामा-मामी करत आहेत. होळीच्या दिवशी गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, आरोपीने या निरागस बालिकेला फूस लावून स्वतःच्या घरात नेले. रक्ताच्या नात्यातील असलेल्या या २२ वर्षीय तरुणाने तिथे तिचा फायदा घेत, तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही, तर हा प्रकार कोणाला सांगितला, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला.(Gadchiroli Crime News)
अंघोळ घालताना समजलं अन्…
घटनेनंतर पाच दिवसांनी, म्हणजेच रविवार, ८ मार्च रोजी, मामी मुलीला अंघोळ घालत असताना तिच्या पोटावर सूज दिसून आली. मामीने प्रेमाने विचारणा केली असता, चिमुकलीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. हे ऐकताच कुटुंबीयांना धक्का बसला. त्यानंतर, कोरची पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मुलीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Gadchiroli Crime News)
तीन दिवसांची पोलिस कोठडी
घटनेची माहिती मिळताच, कोरची पोलिसांनी वेगाने हालचाली करत, नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ रोजी पोलिसांनी जेरबंद केले, ९ रोजी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पो.नि. शैलेंद्र ठाकरे यांनी दिली. उपनिरीक्षक योगेश पवार तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.