दोघांच्या भांडणात तिसऱ्याचे नुकसान, 45 हजार हिंदुस्थानी कंटेनर समुद्रात अडकले!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा जबर फटका हिंदुस्थानसह अन्य देशांना बसत आहे. युद्धाचा परिणाम हिंदुस्थानी निर्यातीवर झाला आहे. युद्ध सुरू झाल्यापासून हिंदुस्थानचे 40 ते 45 हजारांपर्यंत कंटेनर समुद्री मार्गावर आणि विदेशी बंदरावर अडकून पडले आहेत. या कंटेनरमध्ये सध्या जवळपास 1 ते दीड अब्ज डॉलरच्या निर्यातीचा माल पडून आहे. या मालाचे पुढे काय होणार, यावर अनिश्चितता पसरली आहे. जर हे कंटेनर अन्य मार्गाने गेल्यास किंवा हिंदुस्थानात परत आणल्यास निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. शिपिंग कंपन्यांकडून आपात्कालीन आणि अतिरिक्त शुल्क लावण्यात आल्यामुळे प्रति कंटेनरमध्ये 3 ते 5 पट जास्त पैसे मोजावे लागत आहे. कंटेनरमधील मालाचे नुकसान झाल्यास निर्यातदारांचे कंबरडे मोडले जाईल. जे कंटेनर अडकले आहेत त्यामध्ये 4 लाख टन बासमती तांदळाचाही समावेश आहे. 80 टक्के कंटेनर हे समुद्री मार्गावर अडकले आहेत. तर हवाई आणि समुद्री अशी दोन्ही मार्गावर जवळपास एक ते दीड अब्ज डॉलरचा माल अडकला आहे.

Comments are closed.