सायली सुर्वे आता परतली घरी आणि पुन्हा स्वीकारला हिंदू धर्म – Tezzbuzz
सायली सुर्वे हीने मिस इंडिया अर्थ 2019 हि स्पर्धा जिंकली होती आणि तेव्हापासुन प्रचंड ओळख मिळाली. तर आज ती तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आहे. तर तिने एक काही धाडसी निर्णय घेतला आहे, तर सायलीने पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या एका समारंभात तिने हिंदू धर्म स्वीकारला. तर तिच्या या निर्णयामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
तर तिने हे पाऊल का उचलले हे हि सांगितले, मुस्लिम व्यावसायिकाशी झालेल्या लग्नादरम्यान मानसिक, शारीरिक छळाचा सामना करावामुळे हे पाऊल उचलले. या घटना 2019 मध्ये सुरू झाल्या, जेव्हा सायलीने तिच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध मीरा-भाईंदर येथील व्यावसायिक आतिफ तासेशी लग्न केले. आंतरधर्मीय विवाहानंतर सायलीने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचे नाव बदलून अतेजा तासे असे ठेवले. त्यावेळी तिला वाटले होते की ही तिच्या आयुष्यातील एक नवीन आणि आनंदी सुरुवात असेल, परंतु अहवालांनुसार, लवकरच कटुता आणि वाद निर्माण झाला.
सायलीने (Sayali)माध्यमांसमोर जाऊन तिची कहाणी सांगितली, त्यात तिने आतिफ तासेशी लग्न करणे ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचा म्हणली आहे, तिने दावा केला की तिला केवळ मानसिक, शारीरिक छळ करण्यात आला नाही, तर इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि धार्मिक विधी करण्यासाठी सतत दबाव आणला जात होता. सायलीच्या म्हणण्यानुसार, तिच्या चार मुलांच्या भविष्यासाठी तिने जवळजवळ 10 वर्षे हे गुदमरणारे नाते सहन केले.
सायली सुर्वेने इतर महिलांना प्रेरणा देत म्हटले, कोणत्याही मुलीने अत्याचार सहन करू नये. देवाने आपल्याला या रावणांना शरण जाण्यासाठी जीवन दिले नाही. तिने स्पष्ट केले की एक आई म्हणून, तिने तिच्या घराचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी तिच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि स्वाभिमानासाठी बाहेर पडावे लागले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
धुरंधर 2 च्या ट्रेलरनंतर, आणखी एक सरप्राइज, रणवीर सिंगचा अनोखा पोस्टर झाला रिलीज
Comments are closed.