हिंदुस्थानात आणखी 57 अब्जाधीश! रोशनी नादर-मल्होत्रा सर्वात श्रीमंत महिला
हिंदुस्थानात यंदा अब्जाधीशांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. वर्षभरात 57 नव्या अब्जाधीशांची भर पडली असून एकूण संख्या 308 वर पोहोचली आहे, अशी माहिती हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 मधून समोर आली आहे. अब्जाधीशमध्ये हिंदुस्थान आता चीन आणि अमेरिकेनंतर तिसरा देश बनला आहे. हुरून रिपोर्टच्या माहितीनुसार, या यादीत अनेक नवीन लोक हेल्थकेअर, ऑटो कंपोनेंट्स, एनर्जी आणि फायनान्शियल सर्विसेज यांसारख्या सेक्टरमधून आले आहेत. एचसीएल टेक्नोलॉजीजच्या रोशनी नादर-मल्होत्रा तिसऱ्या नंबरवर असून त्यांच्या कुटुंबाची संपत्ती 3.2 लाख कोटी रुपये आहे. रोशनी नादर मल्होत्रा या टॉप 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये एकटय़ा महिला आहेत.
चीन आणि अमेरिका या देशांनंतर हिंदुस्थान अब्जाधीशांच्या संख्येत तिसऱ्या स्थानी आहे. हिंदुस्थानातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती जवळपास 112 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
एकटय़ा मुंबईत ९५ अब्जाधीश
मुंबईत 95 अब्जाधीश आहेत. मुंबईत यंदा सर्वात जास्त 15 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये 14 आणि लंडनमध्ये 9 अब्जाधीश तयार झाले आहेत. एकूण 199 हिंदुस्थानी अब्जाधीशांच्या संपत्तीत वाढ झाली आहे तर 109 अब्जाधीशांच्या संपत्तीत घसरण झाली.
Comments are closed.