सीआयडीच्या चौकशीत VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब; अजितदादांच्या अपघातावर काय म्हणाले?

अजित पवार विमान अपघातावर व्ही.के. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी (Ajit Pawar Plane Crash) व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांनी धक्कादायक जबाब (VK Singh On Ajit Pawar Plane Crash) नोंदवला आहे. व्ही.के.सिंग यांची तीन दिवस सीआयडी चौकशी झाली. या चौकशीत अजित पवारांच्या विमान अपघातप्रकरणी पायलट सुमित कपूरची चूक आहे. यात माझी कीहीही चूक नाही. माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा, असा खळबळजनक जबाब व्ही.के.सिंग यांनी सीआयडीकडे नोंदवला आहे. (VK Singh Inquiry by CID)

व्ही.के. सिंग याला कसं कळलं की पायलटची चूक आहे?; रोहित पवारांचा सवाल (Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash)

अजितदादांच्या विमान अपघाताचा केवळ तपास सुरु असल्याचं CID कडून सांगण्यात येतंय. AAIB च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या विश्वासार्हतेवर तर काय बोलावं हेच कळत नाही, कधी ब्लॅक बॉक्स जळाला म्हणून तर कधी डेटा रिकव्हर केला म्हणून बातम्या पेरल्या जातात. तपास यंत्रणेकडून याबाबत मिठाची गुळणी धरली जाते. ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालं हेच अद्याप बाहेर आलं नाही, तर मग अपघात झाल्यानंतर काही वेळेतच VSR कंपनीचा मालक व्ही.के. सिंग याला कसं कळलं की पायलटची चूक आहे?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हा महाशय पायलटची चूक असल्याचं सांगून स्वतः मात्र हात वर करुन मोकळा होत असेल. तर कदाचित तोफेच्या तोंडी दुसऱ्याला देऊन स्वतः मात्र नामनिराळं राहण्याचा त्याचा डाव दिसतोय. पण अजितदादांच्या अपघाताबाबत यंत्रणेकडून जोपर्यंत ठोस आणि विश्वासार्ह माहिती बाहेर येत नाही तोपर्यंत कुणीही कोणताही आधार नसलेल्या चर्चेवर विश्वास ठेवू नये, असं रोहित पवारांनी सांगितले.

अजितदादांच्या अपघाताचा 22 पानी अहवाल, नेमकं काय काय? (VK Singh On Ajit Pawar Plane Crash)

अजित पवारांच्या विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. (Ajit Pawar Plane Crash Report) बारामती विमानतळावर अजित पवारांचं विमान सकाळी 8 वाजून 46 मिनिटांनी कोसळल्याची माहिती मिळाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. सुरुवातीला हे विमान झाडावर आदळलं. त्यानंतर जमिनीवर कोसळलं. ही घटना घडली तेव्हा बारामती विमानतळावर 3 हजार मीटर दृश्यमानता होती,असं अहवालात नमूद करण्यात आलं. तर, उड्डाणापूर्वी पायलटनं मद्यपान केलं नव्हतं, असंही अहवालात म्हटलंय. मात्र, बारामती विमानतळावर सुविधा अपुऱ्या असल्याचा ठपका, या अहवालात ठेवण्यात आला आहे. (Ajit Pawar Plane Crash Report)

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या प्राथमिक अहवालात काय काय? (Ajit Pawar Plane Crash Report)

  1. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडून प्राथमिक अहवाल प्रसिद्ध
  2. लॅंडिंगवेळी दृश्यमानता फक्त 3 किलोमीटर, VFR नियमांनुसार आवश्यक किमान दृश्यमानता 5 किमी गरजेचे
  3. उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके
  4. बारामती हे अनियंत्रित एअरफिल्ड, रनवे मार्किंग फिकट, सैल खडी, रनवे बाजूस विंडसॉक नाही, संरक्षक भींत अपुरी सारख्या त्रुटी आढळल्या
  5. पहिल्या प्रयत्नात गो-अराउंड, दुसऱ्या प्रयत्नात रनवे वर लँडिंग क्लीअरन्स, पायलटने “Field in sight” कळवलं
  6. अंतिम क्षणी कॉकपिटमधून “Oh S**t…” असा आवाज
  7. विमान रनवेच्या डाव्या बाजूला सुमारे 50 मीटर अंतरावर कोसळले
  8. दोन्ही पायलट यापूर्वी बारामती येथे उड्डाण करून गेले होते आणि त्यांना त्या विमानतळाच्या भौगोलिक रचनेची पूर्ण माहिती होती
  9. दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्स म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर (SSFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (SSCVR) हे विमानाच्या अवशेषांतील त्यांच्या मूळ जागी
  10. दोन्ही रेकॉर्डर्स अवशेषांमधून बाहेर काढण्यात आले असून, डेटा पुनर्प्राप्ती आणि पुढील विश्लेषणासाठी पाठवला
  11. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर्स उच्च तापमानाच्या संपर्कात आल्यामुळे उपकरणांना उष्णतेमुळे नुकसान
  12. फ्लाईट डेटा रेकाॅर्डरचा डेटा यशस्वीपणे डाऊनलोड
  13. काॅकपिट व्हाॅइस रेकाॅर्डर डेटा डाउनलोड करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व तांत्रिक कौशल्य हे निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे, अशात अमेरिकेच्या मानांकननुसार डेटा रिट्रॅक्ट केला जाणार
  14. प्रवासाआधी दोन्ही वैमानिकांकडून मद्यपान करण्यात आलं नव्हतं, टेस्ट निगेटिव्ह

संबंधित बातमी:

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं

आणखी वाचा

Comments are closed.