90 च्या दशकातील हा टीव्ही शो, ज्याने प्रसिद्धीमध्ये चित्रपटांनाही दिली होती टक्कर – Tezzbuzz

बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांनी 90 मध्ये सिनेसृष्टी मध्ये पदार्पण केले. आणि सुरुवातीच्या काळातच त्यांनी त्यांच्या कलेतून प्रेक्षकांच्या मनात भर केले. तसेच दूरदर्शनवरही अनेक कार्यक्रम ही गाजले, टेलिव्हिजन वरील अनेक मालिका अशा होत्या, त्यांनी त्या काळात प्रचंड प्रसिद्धी मिळवली. “शक्तीमान” ची शौर्यगाथा असो किंवा “रामायणाची भक्ती असो,” असे अनेक मालिका गाजल्या. मात्र अशी एक मालिका होती जीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

1993 मध्ये प्रदर्शित झालेली लोकप्रिय मालिका म्हणजे जुनून. ए. सलाम दिग्दर्शित या मालिकेने 1994 ते 1998 पर्यंत जवळजवळ चार वर्षे प्रेक्षकांवर राज्य केले. या शोचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे स्टारकास्ट, तर या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार होते.

“जुनून” ची कथा बॉलीवूडच्या एका मोठ्या मसाला चित्रपटापेक्षा कमी नव्हती. हा शो प्रामुख्याने राजवंश आणि धनराज या दोन प्रभावशाली कुटुंबांभोवती फिरत होता. या कथेत जुने शत्रुत्व, सत्ता संघर्ष आणि गुंतागुंतीचे नातेसंबंध बारकाईने चित्रित केले गेले होते.  शोची भव्यता वाढवण्यासाठी, हे शीर्षकगीत प्रसिद्ध पार्श्वगायक विनोद राठोड यांनी गायले होते.

“जुनून” किंवा मालिकेमध्ये फरीदा जलाल, परिक्षित साहनी, सईद जाफरी, सोनी राजदान, रजत कपूर, तनुजा, राजेश खट्टर, टॉम अल्टर, पंकज बेरी आणि कलाकार आहेत. नीना (nina)गुप्ता असे अनुभवी कलाकार होते. शिवाय, पुनीत इस्सर, अर्चना पूरण सिंग, शाहबाज खान, बीना बॅनर्जी, किट्टू गिडवानी, दीना पाठक, बेंजामिन गिलानी, रविंदर कपूर, मंगल ढिल्लन, एकता सोहिनी, शशी पुरी आणि स्मिता जयकर यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रत्येक भाग संस्मरणीय बनवला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हेही वाचा

रुग्णालयात अनुराग डोभाल यांना पाहून त्यांची पत्नी रितिका झाली भावूक

पोस्ट 90 च्या दशकातील हा टीव्ही शो, ज्याने प्रसिद्धीमध्ये चित्रपटांनाही दिली होती टक्कर वर प्रथम दिसू लागले दैनिक बोंबाबोंब.

Comments are closed.