केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असतानाही अजित पवारांच्या अपघाताची CBI चौकशी का रखडली? रोहित पवारांचा सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अजित पवार यांच्या अपघाताच्या सीबीआय चौकशीची मागणी करूनही केंद्र सरकारकडून होत असलेल्या विलंबावर त्यांनी आश्चर्य व्यक्त करत टीका केली आहे.

रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राज्य व केंद्र सरकार एकाच विचाराचे डबल इंजिन सरकार असेल तर राज्य सरकारने पाठवलेले प्रस्ताव केंद्र सरकार लगेच मान्य करतं असं वाटत होतं. पण अजित दादांसारख्या लोकनेत्याच्या अपघाताच्या सीबीआय चौकशीची राज्य सरकारने मागणी करूनही केंद्र सरकार दखल घेत नाही, कुठेतरी मनाला पटणारे नाही.”

रोहित पवार म्हणाले की, “आज राष्ट्रवादी अजित दादा पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीबाबत स्मरणपत्र दिलं याबद्दल आभार. परंतु सरकारमध्ये राहून सरकारकडेच स्मरणपत्र देण्याची वेळ का येत आहे? याचा विचार करायला हवा. केवळ स्मरणपत्र देऊन चालणार नाही तर, पूर्ण ताकदीने लढावं लागणार आहे. सर्वच जण ताकद लावतील, ही अपेक्षा.”

Comments are closed.