आयपीएलनंतर मिशन 2027! वनडे वर्ल्ड कपसाठी गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन तयार; तयारीबाबत केलं मोठं वक्तव्य

सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav under captaincy) नेतृत्वाखाली भारतीय संघाने रविवारी (8 मार्च) फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत टी-20 वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद पटकावले. या विजयासह भारत तीन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर काही वेळातच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach of team india) यांनी 2027 च्या आगामी वनडे वर्ल्ड कपबाबत मोठी घोषणा केली आहे.
च्या
ते म्हणाले की, आयपीएल 2026 संपेपर्यंत 2027 च्या वर्ल्ड कपची पूर्ण आखणी (ब्लूप्रिंट) तयार असेल. संघ व्यवस्थापन सध्या काही दिवस विश्रांती घेईल आणि त्यानंतर लगेच पुढच्या आयसीसी ट्रॉफीच्या तयारीला लागेल. 2027 चा वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, नामीबिया आणि झिम्बाब्वे मध्ये होणार आहे. तिथल्या खेळपट्ट्या वेगवान आणि उसळणाऱ्या असतात, त्यामुळे तिथल्या परिस्थितीनुसार खेळाडूंची निवड करणे महत्त्वाचे आहे.
च्या
​गंभीर यांनी ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना सांगितले की, आयपीएल 2026 नंतर लगेच आमची तयारी सुरू होईल. मे महिन्याच्या अखेरपर्यंत खेळाडूंची निवड आणि पूर्ण प्लॅनिंग झाले असेल. आयपीएल आणि वर्ल्ड कपच्या दरम्यान 25 ते 30 वनडे सामने आहेत. आजकाल हा फॉरमॅट जास्त खेळला जात नाही, त्यामुळे आम्ही जेवढ्या लवकर नियोजन सुरू करू, तेवढे आमच्यासाठी चांगले असेल.
च्या
​संघातील वातावरणाबद्दल बोलताना गंभीर म्हणाले, माझे तत्वज्ञान अगदी साधे आहे. जर संघातील बहुतेक खेळाडू माझ्यावर खुश नसतील, तर मला त्या ड्रेसिंग रूममध्ये राहण्याचा अधिकार नाही. जर खेळाडू आनंदी असतील, तर याचा अर्थ मी माझे काम योग्य प्रकारे करत आहे. भारतीय संघाचे वातावरण कोणापासूनही लपून राहू शकत नाही, कारण इथे मीडियाची सतत नजर असते.

Comments are closed.