अमेरिका-इराण युद्ध – युद्ध उतरले आहे! डोनाल्ड ट्रम्प इराणशी चर्चेसाठी तयार आहेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविषयी कठोर भूमिका व्यक्त केली आहे. त्यांनी मंगळवारी सांगितले की, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी हे अली खामेनी यांचे पुत्र आहेत. ते शांततेचा मार्ग स्विकारतील असे वाटत नाही. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, अमेरिका इराणशी चर्चा करण्यास तयार आहे, मात्र त्या वाटाघाटी काही अटींवरच होतील.

यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी इराणविरुद्धचे युद्ध लवकरच संपेल असा दावा केला होता. मात्र त्यांनी त्यासाठी कोणतीही निश्चित वेळ दिली नव्हती. त्यांनी इराणला इशाराही दिला की, जर त्यांनी पुन्हा आक्रमक पावले उचलली तर अमेरिका कठोर प्रत्युत्तर देईल. सीबीएसला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. त्यांनी सांगितले की इराणने “काहीही चलाखी करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील.”

ट्रम्प यांच्या मते, सध्याच्या संघर्षामुळे इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाली आहे. “त्यांच्याकडे नौदल नाही, संपर्क व्यवस्था नाही आणि हवाई दलही प्रभावी राहिलेले नाही,” असा दावा ट्रम्प यांनी केला. त्यांनी असेही सांगितले की, अमेरिका आणि तिच्या मित्र राष्ट्रांनी अनेक बाबतीत आधीच विजय मिळवला आहे. तरीही अंतिम विजय मिळवण्यासाठी अमेरिका अधिक निर्धाराने पुढे जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, जर अमेरिका आणि इस्त्रायल यांनी आधी कारवाई केली नसती तर इराण हल्ला करण्याच्या तयारीत होते.

Comments are closed.