गप्प बसा… भर कार्यक्रमात ज्युनिअर एनटीआर चिडला, चाहत्यांच्या गोंधळामुळे संतापला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिणेतील सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर एका कार्यक्रमादरम्यान चाहत्यांच्या गोंधळामुळे भडकला. कार्यक्रम सुरु असताना चाहत्यांनी मध्येच घोषणा देणे, ओरडणे हे सर्व प्रकार सुरु असल्याने ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला. मिळालेल्या माहितीनुसार बेंगळुरूमधील केआयएमएस सुपर स्पेशॅलिटी हाॅस्पिटलच्या उद्घाटनासाठी तो प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. त्याच्या आगमनाची माहिती मिळताच शेकडो चाहते रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले आणि कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडाला.

कार्यक्रम सुरू असताना चाहत्यांनी जोरात घोषणा देणे, ओरडणे आणि फोटो-व्हिडिओ काढण्यासाठी पुढे धावणे सुरू केले. काही चाहत्यांनी सुरक्षा व्यवस्था मोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थिती काही काळ नियंत्रणाबाहेर गेली. या गोंधळात रुग्णालयातील एस्कलेटरलाही नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. गोंधळ वाढत असल्याचे पाहून ज्युनिअर एनटीआरने मंचावरुनच चाहत्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.

“कृपया शांत राहा… Quiet… Quiet…!” असे त्याने म्हटल्यावर काही वेळातच प्रेक्षक शांत झाले आणि कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्यात आला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी अनेकांनी ज्युनिअर एनटीआर याने संयम राखत परिस्थिती हाताळल्याबद्दल त्याचे कौतुक केले. तर काहींनी कार्यक्रमातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.

Comments are closed.