टीम इंडियाला तब्बल 131 कोटी रुपयांचे रोख बक्षीस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी क्रिकेटच्या धुरंधरांनी पुन्हा एकदा जगाच्या क्रिकेट नकाशावर आपला झेंडा रोवला आणि त्या पराक्रमाला सलाम करत बीसीसीआयने अक्षरशः पैशांचा पाऊस पाडण्याची घोषणा केली आहे. टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास घडवणाऱया या जगजेत्या संघावर तब्बल 131 कोटी रुपयांच्या रोख बक्षिसांचा वर्षाव होणार असून बीसीसीआयने आज ही मोठी घोषणा करत विजयाचा आनंद द्विगुणित केला.

हिंदुस्थानी संघाने 2024 मध्ये टी-20 विश्वचषकावर नाव कोरत 13 वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर जेतेपद राखण्याचे आव्हान होते. मात्र ‘जिंकणे सवय बनली की इतिहास घडतो’ या म्हणीप्रमाणे हिंदुस्थानी संघाने पुन्हा जग जिंकत तिसरे टी-20 विश्वविजेतेपद पटकावले. या यशाचा सन्मान म्हणून बीसीसीआयने 2024 मध्ये दिलेल्या 125 कोटींच्या बक्षिसात 6 कोटींची भर घालत 131 कोटींचा मानाचा मुजरा केला.

Comments are closed.