इराणी महिला फुटबॉलपटूंना ऑस्ट्रेलियाचा आश्रय

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एएफसी आशियाई चषक स्पर्धेत राष्ट्रगीत न गाण्याच्या घटनेमुळे इराण महिला फुटबॉल संघाभोवती निर्माण झालेला वाद आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पेटला आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने पुढाकार घेत इराणच्या पाच महिला फुटबॉलपटूंना मानवीय कारणावरून विशेष व्हिसा देत देशात आश्रय दिला आहे. या निर्णयामुळे इराणमध्ये निर्माण झालेल्या संतापाच्या लाटेतून या खेळाडूंना काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाचे स्थलांतर मंत्री टोनी बर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, जहरा घनबारी, जहरा सरबली, फतेमेह पसंदिदेह, अतेफे रमजानजादेह आणि मोना हमौदी या पाच खेळाडूंना मानवीय व्हिसा देण्यात आला आहे. सध्या त्यांना सुरक्षितस्थळी ठेवण्यात आले असून त्या ऑस्ट्रेलियात राहू शकतात.

Comments are closed.