लेबनॉनमध्ये सफेद फॉस्फरसचा बेकायदेशीर वापर, मानवाधिकार निरीक्षक संघटनेचे इस्रायलवर ताशेरे

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लेबनॉनमध्ये मानवी वस्त्यांवर अमानुष हल्ले करणारा इस्रायल मानवाधिकार निरीक्षक संघटनेच्या रडारवर आला आहे. मित्रराष्ट्रांनी इस्रायलला आवर घालावा, अशी अपेक्षा मानवाधिकार निरीक्षक संघटनेने केली आहे.

‘इराणशी युद्ध पेटल्यानंतर तिसऱ्याच दिवशी इस्रायलने हिजबुल्लाह संघटनेला लक्ष्य करत लेबनॉनवर हल्ले सुरू केले. हे हल्ले करताना इस्रायली सैन्याने अत्यंत घातक असा पांढरा फॉस्फरस वापरल्याचा आरोप होत आहे. ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यावर पेट घेणारा पांढरा फॉस्फरस मानवांसाठी अत्यंत हानीकारक ठरू शकतो. या रसायनामुळे केवळ शरीराचा दाह होतो असे नाही तर हा फॉस्फरस माणसाला हाडापर्यंत जाळतो. अशा रसायनाच्या वापराबद्दल मानवाधिकार निरीक्षक संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Comments are closed.