आयपीएल 2026 चा पहिला सामना कोणत्या संघांमध्ये होणार? यंदा स्पर्धेचा इतिहास बदलणार

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ नंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६चा हंगाम सुरू होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मागील हंगामांपेक्षा काहीसा बदल झालेला दिसणार आहे. गेल्यावर्षी अंतिम सामन्यात खेळलेले संघ या हंगामाची सुरूवात करणार नाही. मागील हंगामाच्या अंतिम सामन्यात भिडलेले रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) आणि पंजाब किंग्ज वेगवेगळ्या दिवशी २०२६च्या हंमागात आपल्या प्रवासाची सुरूवात करणार आहे.
काही रिपोर्ट्सनुसार, गतविजेता आरसीबी २८ मार्चला बेंगलोरमध्ये हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज २९ मार्चला मुल्लनपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध पहिला सामना खेळण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२६ची सुरूवात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याने होणार आहे. हा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिलाच सामना आयपीएलच्या दोन आवडत्या संघांमध्ये असल्याने चाहत्यांसाठी मोठी बाब आहे. यामधील आणखी एक रोमांचक माहिती म्हणजे भारताच्या दोन मोठ्या दिग्गजांमधील एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यातील हा सामना.
विराट विरुद्ध धोनी पहिलाच सामना असल्याने आयपीएलच्या पहिल्याच दिवशी विक्रमी तिकीटविक्री होईल. त्याचबरोबर थेट प्रक्षेपणामध्ये व्हुयरशीपही मोठी मिळेल. आयपीएल सुरू होण्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षकांसोबत एक वार्षिक बैठक २५ मार्चला मुंबईमध्ये घेणार आहे. तसेच १५ मार्चला दिल्लीमध्ये सर्व कर्णधारांचे फोटोशूट होईल.
आयपीएलचा पहिला हंगाम २००८मध्ये खेळला गेला. तेव्हापासून या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यासाठी आरसीबीला बरिच प्रतिक्षा करावी लागली. यादरम्यान संघाचे नेतृत्व राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांनी केले होते, मात्र त्यांना एकदाही विजेतेपद जिंकता आले नाही. २०२५मध्ये रजत पाटीदारला कर्णधारपदाची सूत्रे सोपवली आणि त्याने नेतृत्वाच्या पहिल्याच हंगामात संघाला विजेतेपद जिंकून दिले.
Comments are closed.