वसई-विरार महापालिकेचा चार हजार 208 कोटींचा अर्थसंकल्प; पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक योजनांवर भर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वसई-विरार महापालिका प्रशासनाने येत्या आर्थिक वर्षासाठी 4 हजार 208 कोटींचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीला सादर केला. स्थायी समितीमध्ये या अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर हा अर्थसंकल्प महासभेत मांडण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी अर्थसंकल्प सादर करताना पर्यटन, पायाभूत सुविधा आणि सामाजिक योजनांवर विशेष भर दिला आहे.

पर्यटन विकासासाठी केळीचे गाव, फुलांचे गाव, फिशरमन व्हिलेज आणि रांगोळी गावे या संकल्पनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच तुंगारेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी तुंगारेश्वर विकास आराखड्याला निधी देण्यात आला आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी स्मार्ट मीटर प्रकल्पाचा अभ्यास, स्वच्छता उपक्रम, दिव्यांगांसाठी दिव्यांग पार्क आणि संविधान जनजागृतीसाठी संविधान पार्क उभारण्याची योजना या अर्थसंकल्पात आहे. याशिवाय चार नवीन अग्निशमन केंद्रे, बर्ड पार्क, रस्ते, फ्लायओव्हर, तसेच महापालिका कार्यालयांच्या विस्तारासाठीही निधी ठेवण्यात आला आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीत किरकोळ वाढ प्रस्तावित करण्यात आली असून या अर्थसंकल्पामुळे शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.

Comments are closed.