BMC मधील अनुभवी नगरसेवक, पण तरीही चुकून ठाकरे गटाऐवजी भाजपला मतदान; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
BMC Samiti Election 2026 Shivsena UBT Uddhav Thackeray: एस आणि टी प्रभागात भाजप आणि ठाकरे गटाची सदस्यसंख्या प्रत्येकी 10-10 असल्याने अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. मात्र मतदानावेळी ठाकरे गटाच्या दोन नगरसेवकांनी चुकीच्या रकान्यात (भाजपच्या) स्वाक्षरी केल्याने त्यांची मते बाद ठरली. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका साक्षी दळवी यांचा विजय झाला, तर ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश शिंदे यांचा पराभव झाला. (BMC Samiti Election 2026)
मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांची चूक भाजपसाठी फायदेशीर ठरली. मुंबई महानगरपालिकेच्या एस आणि टी प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानावेळी (BMC Samiti Election 2026) झालेल्या गोंधळानंतर आता उद्धव ठाकरे गटाकडून (Shivsena UBT) दोन नगरसेवकांना नोटीस पाठवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सुरेश शिंदे आणि दीपमाला बढे यांच्यावर उद्धव ठाकरे काय कारवाई करणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुरेश शिंदे आणि दीपमाला बढे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले जाणार- (BMC Samiti Election 2026 Shivsena UBT Uddhav Thackeray)
दरम्यान, चुकीच्या रकान्यात स्वाक्षरी केल्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा झाल्याचा आरोप होत असून संबंधित नगरसेवक सुरेश शिंदे (Suresh Shinde) आणि दीपमाला बढे (Deepmala Badhe) यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले जाण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
नेमकं काय झालं? (BMC समिती निवडणूक 2026 शिवसेना UBT उद्धव ठाकरे)
10-10 सदस्य संख्या असल्याने या प्रभागात निवडणूक झाली होती. मात्र, ठाकरे सेनेचे दोन मतं बाद ठरल्याने अखेर भाजप उमेदवाराचा विजय झाला. त्यामुळे भाजपच्या साक्षी दळवी प्रभाग समिती अध्यक्षपदी विराजमान झाल्या. समितीमध्ये महायुतीचे 10 आणि ‘उबाठा’ सह मित्रपक्षांचे 10 असे एकूण 20 सदस्य आहेत. ‘उबाठा’चे सुरेश शिंदे व ‘उबाठा’च्या नगरसेविका दीपमाला बढे यांनी भाजपच्या उमेदवार साक्षी दळवी यांच्या बाजूने असलेल्या कॉलममध्ये सह्या केल्या. त्यामुळे ही दोन मते अवैध ठरली. दोन्ही अनुभवी नगरसेवकांनी या चुका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदी एमआयएमच्या खैरनुसा हुसेन यांना आठ मते मिळाली, तर शिवसेनेच्या प्रज्ञा सदाफुले यांना पाच मते मिळाली. तर, एक मत अवैध ठरले. त्यामुळे एमआयएमच्या हुसेन निवडून आल्या. एम पश्चिम, एल आणि एन या प्रभागांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे भाजपच्या आशा मराठे, शिवसेनेचे विजयेंद्र शिंदे आणि भाजपच्या अश्विनी मते यांची बिनविरोध निवड झाली. 17 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी 5, 6 आणि 9 मार्च रोजी निवडणुका पार पडल्या. एकूण 17 पैकी 11 प्रभाग समित्यांवर भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले. उर्वरित सहा समित्यांच्या अध्यक्षांमध्ये उबाठाचे दोन, काँग्रेसचे दोन, मनसेचे एक आणि एमआयएमचे एक उमेदवार निवडून आले आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.