अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोब

अजित पवार आणि नरेश अरोरा: अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर नरेश अरोरा हे कुठे गेले आहेत? ते व्हीएसआर कंपनीबाबत काहीच का बोलत नाहीत? अजितदादांच्या निधनानंतर फक्त एक-दोन दिवस नरेश अरोरा (Naresh Arora) दिसले. त्यानंतर ते गायब झाले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नरेश अरोरा अजितदादांच्या अभिनंदनासाठी आले होते, तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढला होता. मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं की, तुम्ही सोल्जर नाही तर तुम्ही सॅलरी सोल्जर (पगारी सैनिक) आहात, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. (Ajit Pawar Plane crash)

नरेश अरोरा हे अजित पवार यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते.अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर व्हीएसआर कंपनीबाबत नरेश अरोरा काहीच बोलत नाहीत. डीजीसीएच्या अहवालानंतर त्यावर काही कंटेट देण्याची जबाबदारी नरेश अरोरा यांची होती. पण ते आता कुठे आहेत? ‘बहेती हवा सा था वो, कहा गया उसे ढुंढो’, असे त्यांच्याबाबत बोलण्याची वेळ आली आहे.  नरेश अरोरा हे अजितदादांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळायचे. त्यांनीच अजितदादांना गुलाबी जॅकेट दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या स्ट्रॅटेजी तेच ठरवत होते. विधानसभा  निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी अजितदादांना पुष्पगुच्छ देताना खांद्यावर हात टाकला होता. पण आता अरोरा कुठे गेले आहेत, असा प्रश्न मला पडला. त्यामुळे मी ट्विट केल्याचे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले.

नरेश अरोरा देशात आहेत की देशाबाहेर आहेत, हे माहिती नाही. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर ते कुठेच दिसले नाहीत? खरंतर या दु:खाच्या काळात त्यांनी आमच्यासोबत राहायला हवे होते. त्यांनी अजितदादांच्या अपघातप्रकरणावर काहीतरी बोलायला हवे होते. आतादेखील त्यांचं कॉन्ट्रॅक्ट सुरुच असेल ना? मी असं बोलल्यावर आपल्या पक्षाचा आमदार असं कसं बोलतोय, असा प्रश्न ते इतर नेत्यांना विचारतील. ते थोडेसे नाराज होतील. पण त्यांचा मला कधी फोन येत नाही, मी त्यांना कधी फोन करत नाही. सभागृहात अजून अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर चर्चा झालेली नाही. या आठवड्यात दोन दिवस झाल्यानंतर पुढील आठवड्यात अधिवेशनात सुट्ट्या आहेत. त्यानंतर अधिवेशन संपेल. रोहित पवार त्यांच्या पद्धतीने या मुद्द्यावर चर्चा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.

आणखी वाचा

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?

आणखी वाचा

Comments are closed.