मी सार्वजनिक जीवन निवडले, मुलीने नाही! लेकीच्या सुरक्षेसाठी प्रियांका चोप्राने नेमला सुरक्षा रक्षक

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला प्रियांका चोप्राच्या नावाचा बोलबाला आहे. प्रियांकाने अलीकडेच तिच्या मुलीच्या सुरक्षेविषयी एक विधान केले आहे. त्यामुळे प्रियांका पुन्हा एकदा तिच्या मुलीच्या एकूणच संगोपनाबद्दल किती जागरूक आहे हे दिसून आले आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास दोघेही त्यांची मुलगी मालतीला शक्य तितके सार्वजनिक प्रकाशझोतापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले.

एका पॉडकास्ट मुलाखतीदरम्यान प्रियांकाने स्पष्ट केले की, लोकांना तिच्या मुलीबद्दल उत्सुकता असणे तिला समजते. मात्र तिची सर्वात मोठी प्राथमिकता म्हणजे मुलगी सुरक्षित आणि संरक्षित राहणे. “मी सार्वजनिक जीवन स्वतःहून निवडले आहे, पण माझ्या मुलीने तसे केलेले नाही,” असे प्रियांकाने सांगितले.

प्रियांकाने एक चिंताजनक प्रसंगही सांगितला. एकदा तिची मुलगी शाळेतून घरी येत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्या मागे येत तिचे रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर प्रियांका आणि निक अधिक सावध झाले आणि त्यांनी मुलीच्या सुरक्षेसाठी खास सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेतला. प्रियांकाच्या मते, सुरक्षा रक्षकांचा उद्देश केवळ प्रसिद्धीपासून तिला दूर ठेवणे नाही तर, त्याचबरोबर मुलीच्या गोपनीयतेचे रक्षण करणे हे देखील आहे. परवानगीशिवाय फोटो किंवा व्हिडिओ काढले जाणे टाळण्यासाठी हा सुरक्षा रक्षक नेमण्यात आल्याचे तिने सांगितले.

प्रियांका पाॅडकास्ट दरम्यान म्हणाली, माझ्या मुलीने शक्य तितके सामान्य आयुष्य जगावे असे वाटते. भविष्यात मालतीला सार्वजनिक जीवनात यायचे की नाही, हा निर्णय तिने स्वतः घ्यावा, अशी तिची इच्छा आहे. मुलांनी सुरक्षिततेसोबतच लोकांवर विश्वास ठेवून मोठे व्हावे, असेही ती म्हणाली.

सध्या प्रियांका ‘सिटाडेल’ या बहुचर्चित वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनमध्ये दिसणार आहे. तसेच ती दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या मोठ्या बजेटच्या चित्रपटात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासोबत कामात व्यस्त आहे.

Comments are closed.