इंधनाचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करा, विधानपरिषदेत सचिन अहिर यांची मागणी
राज्यात सध्या गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असतानाच, आता पेट्रोलचे दरही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सचिन अहिर यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. इंधनाचा तुटवडा निर्माण करून त्याचा काळाबाजार करणाऱ्या साठाखोरांवर सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
सचिन अहिर यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, “गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. पेट्रोलचेही वाढणार आहेत. राज्य सरकारने यावर उपयोजनात्मक धोरण केले पाहिजे. एक विशेष पथक सरकारने आणून इंधनाचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी. शासनाने तातडीने गॅस तुटवड्याबाबत उपाययोजनांची निवेदन करावे. “
Comments are closed.