IPL 2026: 28 मार्चपासून हंगामाला सुरुवात, सलामी सामन्यात चॅम्पियन आरसीबीचा सामना, पाहा विरोधी संघ कोण?

बीसीसीआयने आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सध्याचे वेळापत्रक २८ मार्च ते १२ एप्रिल पर्यंतचे समोर आले आहे. उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. पहिला सामना गतविजेता आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होईल. हा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. दुसरा दिवस रविवार आहे आणि या दिवशी मुंबई इंडियन्स मुंबईत केकेआरशी भिडतील. या वर्षीचा पहिला डबलहेडर सामना ४ एप्रिल रोजी, शनिवारी खेळला जाईल. दिवसाचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दुपारी ३ वाजता सुरू होईल. त्यानंतर गुजरात टायटन्सचा सामना संध्याकाळी राजस्थान रॉयल्सशी होईल.

दुसऱ्या दिवशी, रविवारी पुन्हा दोन सामने होतील. पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ यांच्यात दुपारी ३ वाजता सुरू होईल. त्यानंतर आरसीबी आणि सीएसके यांच्यात सायंकाळी ७ वाजता सामना होईल. सध्या, वेळापत्रक १२ एप्रिलपर्यंत उपलब्ध आहे, मुंबई इंडियन्स आणि आरसीबी मुंबईत आमनेसामने येतील. दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक देखील पुढील आठवड्यात जाहीर होण्याची अपेक्षा आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्यामुळे त्या तारखा जाहीर झाल्यानंतर बीसीसीआय पुन्हा वेळापत्रक जाहीर करेल.

आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक येथे आहे.

आयपीएल 2026 वेळापत्रक (फेज 1)

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
28 मार्च 7.30 वाजता, बंगळुरु

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
29 मार्च, 7.30 वाजता, वानखेडे, मुंबई

राजस्थान राॅयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
30 मार्च, 7.30 वाजता, गुवाहटी

पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात जायंट्स
31 मार्च, 7.30 वाजता, मुल्लानपूर

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
1 एप्रिल, 7.30 वाजता, लखनऊ

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
2 एप्रिल, 7.30 वाजता, कोलकाता

चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज
3 एप्रिल, 7.30 वाजता, चेन्नई

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
4, एप्रिल, दुपारी 3 वाजता, दिल्ली

गुजरात जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
4 एप्रिल, 7.30 वाजता, अहमदाबाद

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स
5 एप्रिल, 3 वाजता, हैदराबाद

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
5 एप्रिल 7.30 वाजता, बंगळुरु

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स
6 एप्रिल 7.30 वाजता, कोलकाता

राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स
7 एप्रिल 7.30 वाजता, गुवाहाटी

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स
8 एप्रिल संध्याकाळी 7.30, दिल्ली

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
9 एप्रिल 7.30 वाजता, कोलकाता

राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
10 एप्रिल 7.30 वाजता, गुवाहाटी

पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद
11 एप्रिल 3.30 वाजता, मुल्लानपूर

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
11 एप्रिल 7.30 वाजता, चेन्नई

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स
12 एप्रिल 3.30 वाजता, लखनऊ

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
12 एप्रिल 7.30 वाजता, मुंबई

Comments are closed.