इंडिगोच्या सीईओचा राजीनामा, राहुल भाटिया यांनी पदभार स्वीकारला

नवी दिल्ली :

हवाई क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंडिगो एअरलाइन्सचे सीईओ पीटर एलबर्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून इंडिगो हवाई विमान कंपनी अनेक संकटाचा सामना करत होती. विविध संदर्भातल्या ग्राहकांच्या वाढत्या तक्रारीनंतर अखेर पीटर एलबर्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यांच्या जागी आता अंतरिम सीईओ म्हणून राहुल भाटिया हे काम पाहत आहेत. इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड यांच्या अंतर्गत इंडिगोची विमान सेवा भारत व जगभर कार्यरत असते. कंपनीच्या संचालक मंडळाने पीटर एलबर्स यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

असं काय घडलं

गेल्या 2022 पासून एलबर्स हे कंपनीचे सीईओ म्हणून कार्यरत होते. गेल्या 3 व 5 डिसेंबर रोजी इंडिगोने जवळपास 2507 विमाने रद्द करण्यासोबतच 1852 विमानांना विलंब झाल्याने हजारो विमान प्रवाशांचे हाल झाले होते. त्यावेळी हजारो विमान प्रवाशांनी झालेल्या त्रासामुळे कंपनीच्या नावाने बोटे मोडली होती. विमान प्रवाशांना योग्य ती वागणूक, सेवा दिली गेली नव्हती. त्यामुळे कंपनीवर प्रवाशांचा रोष वाढला होता. याच दरम्यान कंपनीवर हवाई वाहतूक विभागाने 22 कोटींचा दंडही आकारला होता. या साऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अखेर सीईओ एलबर्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Comments are closed.