गॅस टंचाईच्या भीतीने देशभर अराजक माजले आहे

अनेक राज्यांमध्ये सिलिंडर वितरण कार्यालयांबाहेर ग्राहकांच्या लांबलचक रांगा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिका-इस्रायल युद्धामुळे इराणसोबत देशभरात एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी एजन्सींमध्ये लांब रांगा लागल्या आहेत. दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध लादल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये स्वयंपाकाची समस्या निर्माण झाली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. घरगुती स्वयंपाकाचा गॅस खरेदी करण्यासाठी गॅस एजन्सीजच्या बाहेर लांब रांगा लागल्या आहेत. लग्नाचे आयोजन करणाऱ्या कुटुंबांमध्येही चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.

उत्तर प्रदेशात बुकिंगच्या चार ते पाच दिवसांनंतरही सिलिंडर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहेत. गॅस एजन्सीजच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. गोरखपूर आणि सिद्धार्थनगरमध्ये पोलीस संरक्षणात सिलिंडर वितरण सुरू आहे. लोक पहाटे 3 वाजेपासून एजन्सीजमध्ये येत असून तासन्तास वाट पाहत आहेत, परंतु तरीही सिलिंडर्स मिळत नाहीत. बिहारमध्येही दोन दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर बुकिंग थांबवण्यात आली आहेत. घरगुती गॅससाठी राज्यातील अनेक जिह्यांमध्ये लांब रांगा दिसल्या. गोपाळगंज, खगरिया, औरंगाबाद आणि पटनासह अनेक जिह्यांमध्ये लोक सकाळीच गॅस वितरण कंपन्यांबाहेर रांगा लावून थांबलेले दिसून आले.

राजस्थानमध्ये 1,900 रुपयांचे व्यावसायिक सिलिंडर 2500 रुपयांना विकले जात आहेत. काही व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी, विविध एजन्सी नमूद केलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीत विक्री करून काळाबाजार करत आहेत. गुजरातमध्येही व्यावसायिक गॅस सिलिंडडरची मागणी 2,500 ते 3,000 रुपयांपर्यंत केली जात आहे. या काळ्या बाजारामुळे लहान दुकानदार आणि हॉटेल मालकांना आर्थिक अडचणी येत आहेत. राज्यातील अनेक जिह्यांमध्ये घरगुती गॅससाठीही लांब रांगा लागल्या आहेत.

Comments are closed.