भांडुपमध्ये ऑईल सांडल्याने अनेक दुचाकी घसरल्या

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भांडुप पंपिंग सिग्नल येथे आज सकाळी गडबड झाली. पालिकेकडून सांडपाण्याचे काम सुरू असताना रस्त्यावर जड तेल, ड्रेनेज स्लरी सांडल्यामुळे त्यावरून दुचाकीस्वार घसरून पडल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. भांडुप पंपिंग सिग्नल येथे पालिकेकडून सांडपाणी काढण्याचे काम सुरू असताना रस्त्यावर तेल सांडले. परिणामी रस्ता निसरडा झाल्याने अनेक दुचाकीस्वार त्यावरून घसरून पडले. याप्रकरणी आमच्याकडे कुठलीही तक्रार नसल्याचे विक्रोळी पोलिसांकडून सांगण्यात आले.

Comments are closed.