आसारामबापूंनी रामलल्लाचे दर्शन घेतले
व्हीआयपी’ सुविधा
वृत्तसंस्था/ अयोध्या
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेले आसारामबापू यांनी बुधवारी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यांच्या दर्शनावेळी तीन वाहनांचा ताफा आदि शंकराचार्य प्रवेशद्वारातून राम मंदिर परिसरात दाखल झाला. त्यांना विशेष पाहुणे म्हणून रामलल्लाचे ‘व्हीआयपी’ दर्शन देण्यात आले. ते सुमारे 30 मिनिटे राम मंदिरात राहिले. मंदिर बांधकामाचे प्रभारी गोपाल राव यांनी त्यांना मंदिर बांधकामाच्या कामाची माहिती दिली. आसारामबापू मंगळवारी संध्याकाळी उशिरा अयोध्येत पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी सरयू नदीच्या काठावर पूजा आणि महाआरतीतही सहभाग घेतला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अयोध्येतील राममंदिराच्या महत्त्वावर भाष्य केले होते. बुधवारी सकाळी त्यांनी आदि शंकराचार्य गेटमधून राम मंदिरात प्रवेश करत रामलल्लासमोर प्रार्थना करत दर्शन घेतले.
Comments are closed.