लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला भूत बंगलाचा ट्रेलर, अक्षय कुमार अन् प्रियदर्शन पुन्हा करणार का मोठा धमाका – Tezzbuzz
अक्षय कुमार हा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. तर तो नेहमीच चर्चेत असतो आणि आता तो त्याच्या आगामी चित्रपट भूत बंगला यासाठी चर्चेत आला आहे. भूत बंगला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत असून आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमारची जोडी 14 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परत येत आहे. तर या जोडीने यापूर्वी उत्तम कॉमेडी चित्रपट दिले आहेत आणि ते बॉक्स ऑफिसवर चांगले गाजले आहे.
यापूर्वी दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार या जोडीने सुपरहिट चित्रपट दिले आहेत, ज्यात हेरा फेरीचा समावेश आहे. त्यापैकी सर्वात उल्लेखनीय म्हणजे 2007 मध्ये प्रदर्शित झालेला ‘भूल भुलैया’. जो हॉरर कॉमेडी चित्रपट होता. यामध्ये विद्या बालन अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती. तर हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला. आणि 84 कोटी रुपयांची कमाई केली. भूल भुलैय्या 2 ने 266 कोटी रुपयांची कमाई केली होती. भूल भुलैय्या 3400 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. तर या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड भूत बंगला हा चित्रपट रेकॉर्ड तोडेल का ते पाहणे गरजेचे आहे.
अक्षय कुमार (Kumar)अभिनीत भूत बंगला या चित्रपटाची चाहते बऱ्याच काळापासून भूत बांगला चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट आता 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, तब्बू आणि परेश रावल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मनोज जोशी, विंदू दारा सिंग, असरानी, मिथुन चक्रवर्ती, शहनाज गिल, राजपाल यादव, जेमी लिव्हर, वामिका गब्बी आणि मनु मेनन हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. हा चित्रपट मूळतः 15 मे रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी त्याची रिलीज तारीख 10 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
हंसिका मोटवानीचे लग्न का तुटले? घटस्फोटाच्या कागदपत्रांनी उघड केली अनेक गुपिते
Comments are closed.