आत्माराम मोरे स्मृती आंतर रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा 23 मार्चपासून

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे आंतर रुग्णालय टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 23 ते 30 मार्च 2026 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील एमजेएससी मैदानावर रंगणार आहे.

जखमी क्रीडापटूंना तातडीने रुग्णालयीन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विविध रुग्णालयांमधील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी क्रिकेटच्या माध्यमातून एकत्र येत असल्याने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी या स्पर्धेची परंपरा जपली आहे. आयडियल स्पोर्ट्स अॅपॅडमीच्या सहकार्याने होणाऱया या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱया हॉस्पिटल संघांनी संयोजक लीलाधर चव्हाण किंवा प्रदीप क्षीरसागर (7977471943) यांच्याशी 13 मार्चपूर्वी संपर्क साधावा.

Comments are closed.