डंपरनं सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडलं, जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद, नेमक
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील प्रेम लोक पार्क परिसरात आकुर्डीवरून चिंचवडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरती एका 14 वर्षाच्या शाळकरी मुलाला आरएमसी ट्रक अर्थात डंपरने(Accident News) चिरडलं. या घटनेत शाळकरी मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला असून या अपघातात फारुक शकील तांबोळी या नववीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Accident News) झाला आहे, या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला असून, घटनेचं गांभीर्य ओळखून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्रक चालक आणि ट्रकला देखील ताब्यात घेतला आहे, सध्या या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.(Accident News)
पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
तर या अपघाताबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक दत्ता चासकर यांनी सांगितले की, प्रेम लोक पार्क जवळून खंडोबा माळी परिसरात चाफेकर चौकाकडे एक आरएमसी ट्रक अर्थात डंपर चालला होता, त्यावेळी सायकलवरून जाणाऱ्या चौदा ते पंधरा वर्षांचा मुलगा फारुक शकील तांबोळी असं त्याचं नाव आहे. तो सायकलवरती चालला होता. पाठीमागून आरएमसी ट्रकने धडक दिली. मुलाला वायसीएम हॉस्पीटलमध्ये दाखल केलेलं आहे. आरएमसी चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्याचा ट्रक देखील ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. चालकाला पोलिस स्टेशनला नेण्यात आलं आहे, त्याचा तपास सुरू आहे. साडेबाराच्या आसपास ही घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.(Accident News)
डंपरने सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडले, जागीचं मृत्यू. संतापजनक दृश्य सीसीटीव्हीत कैद#क्राइमन्यूज #अपघाताच्या बातम्या #पिंपरीचिंचवड pic.twitter.com/6oBbrNoil8
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) १२ मार्च २०२६
मुलाचे नाव फारुक शकील तांबोळी असं आहे. तो इयत्ता नववीमध्ये आहे. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. योग्य कारवाई सुरू आहे. अशा डंपरला शहरात येण्यासाठी काही काळ ठरवून दिलेला आहे. आपल्याकडे १२ वाजल्यानंतर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. हा अपघात साडेबारा वाजण्याच्या आसपास घडला आहे, त्यामुळे ते प्रतिबंध वेळेत घडले आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत.(Accident News)
आणखी वाचा
Comments are closed.