आयपीएल 2026 च्या ओपनिंग सामन्याचे स्थळ बदलणार? एम चिन्नास्वामी स्टेडियम अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६चा हंगाम २८ मार्चपासून सुरू होत आहे. यामधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (एसआरएच) यांच्यात बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना या स्टेडियमवर होणार की नाही याबाबत मात्र संभ्रम आहे, कारण कर्नाटक सरकारने अजूनही मंजुरी दिलेली नाही. त्याबाबतची आणखी माहिती समोर येत आहे.

आयपीएल २०२५च्या चेंगराचेंगरीनंतर सुरक्षा आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यासाठी १३ मार्चला एक तज्ज्ञ समिती नेमली असून ती स्टेडियमची तपासणी करणार आहे आणि त्यांच्या निर्णयानंतरच आरसीबीचे सामने येथे खेळवावे की नाही हे ठरेल.

जून २०२५ मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या गेट क्रमांक १,६, ७, १७ आणि २१ येथे मोठी चेंगराचेंगरी झाली होती. त्यानंतर स्टेडियमच्या सुरक्षेबद्दल प्रश्न उपस्थित झाले होते. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनला (केएससीए) सर्व अत्यावश्यक सुविधा पूर्ण करण्यासाठी १५ मार्चपर्यंत वेळ दिला आहे.

माजी भारतीय वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांची केएससीएच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी स्टेडियममधील प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. केएलसीएने त्यांच्या निवेदनात म्हटले की सुरक्षेमध्ये आढळलेल्या कमी दूर करण्यात आल्या आहेत. जुलै २०२५ मध्ये राज्याच्या वीज नियामक संस्थेने स्टेडियमचा वीजपुरवठा खंडीत केला होता, जो आता सुरू करण्यात आला आहे.

घटनेनंतर स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये नवे प्रवेशद्वार आणि प्रेक्षकांसाठी नवे वॉकवे यांचा समावेश आहे. स्टेडियमच्या आसपास होल्डिंग एरिया तयार केला गेला आहे. इमरजेंसीसाठी वेगळे मार्ग तयार करण्यात आले आहे. तसेच बेंगलोर मेट्रोसोबत तिकीट व्यवस्थेतही बदल केला आहे. QR स्कॅनिंग सिस्टम लागू केले आहे.

या स्टेडियमवर आयपीएल २०२६चा पहिला सामना खेळला जाणार आहे. तसेच ५ एप्रिलला आरसीबी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामनाही एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. येथे आरसीबीचे आयपीएल २०२६ मधील ५ सामने होणार आहेत. बाकीचे सामने रायपूरमध्ये खेळण्याचे नियोजन आहे. सध्या आयपीएलचे केवळ २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बाकी सामने निवडणुकानंतर जाहीर करण्यात येणार आहे.

Comments are closed.