आक्रमकांच्या रक्ताने पर्शियन आखात रंगवू; इराणचा अमेरिका-इस्रायलला टोकाचा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेतील युद्ध भीषण वळणावर पोहोचले असून इराणने आता अमेरिका आणि इस्रायलला अत्यंत टोकाचा इशारा दिला आहे. “जर अमेरिका किंवा इस्रायलने पर्शियन आखातातील (Persian Gulf) इराणच्या कोणत्याही बेटावर किंवा भूभागावर हल्ला करण्याची हिंमत केली, तर इराण आपला संयम सोडेल आणि हे संपूर्ण आखात आक्रमकांच्या रक्ताने रंगवून टाकेल,” अशी उघड धमकी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर गलीबाफ यांनी दिली आहे.

मोहम्मद बघेर गलीबाफ यांनी सोशल मीडियावरून आपल्या शत्रूंना थेट आव्हान दिले आहे. X वर पोस्ट करत ते म्हणाले की, इराणच्या सार्वभौमत्वावर झालेला कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही. “आमच्या जमिनीवर झालेला एकही वार आक्रमकांसाठी महाग पडेल. आम्ही सर्व मर्यादा झुगारून देऊ आणि पर्शियन आखाताला हल्लेखोरांच्या रक्ताने लाल करू,” असे विधान त्यांनी केले आहे.

गलीबाफ यांनी आपल्या इशाऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. “या क्षेत्रात सांडणाऱ्या प्रत्येक अमेरिकन सैनिकाच्या रक्ताला वैयक्तिकरित्या डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असतील,” असे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेने इराणच्या खर्ग बेटासारख्या महत्त्वाच्या तळांना लक्ष्य करण्याच्या हालचाली सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने ही अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.

Comments are closed.