पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या

EPF व्याज दर नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजनं आर्थिक वर्ष 2025-26 या वर्षासाठी खातेदारांना  8.25 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे.  आता या व्याजाची रक्कम पीएफ खातेदारांच्या खात्यात कशी आणि कधी जमा होणार हे जाणून घेऊयात.

ईपीएफ खात्यातील व्याज जमा करण्यासाठी सरकारनं किंवा ईपीएफओकडून कोणतीही तारीख निश्चित केलेली नसते. व्याज खात्यात जमा करण्यापूर्वी तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडून आर्थिक वर्षासाठी ईपीएफच्या व्याज दराची निश्चिती केली जाते.  सीबीटीनं घेतलेला हा निर्णय केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जोत. केंद्र सरकारनं अंतिम निर्णय घेतल्यानंतर व्याज सदस्यांच्या खात्यात जमा केलं जातं.

सध्या या प्रक्रियेतील केवळ पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यापूर्वीच्या वर्षांचा आढावा घेतल्यास सरकारकडून अंतिम मंजुरी मिळण्यास 2 ते  3 महिने लागू शकतात.  2025 मध्ये सरकारनं व्याज खातेदारांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी 22 मे 2025 ला मंजुरी दिली होती. मात्र, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जुलै महिन्यापर्यंत वेळ लागला होता. तर, आर्थिक वर्ष 2023-24 वर्षी व्याज जमा करण्याची प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरु झाली होती तर ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी डिसेंबरपर्यंत वेळ लागला होता.

ईपीएफ व्याज कसं मोजलं जातं?

ईपीएफ योजना 1952 च्या नियम 60 नुसार व्याज मोजण्याची पद्धत निश्टित करण्यात आली आहे. यानुसार व्याज केंद्र सरकार आणि सीबीटीनं निश्चित केल्यानंतर जमा केलं जातं. ईपीएफचं  मासिक रनिंग बॅलन्सच्या आधारे काढलं जातं. जे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापासून लागू असतं. व्याज मोजण्याचे काही नियम आहेत.

नियम 1 : गतवर्षीच्या शिल्लक रकमेच्या आधारे पूर्ण वर्षाचं व्याज

या नियमानुसार गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी तुमच्या खात्यात जितकी शिल्लक असेल त्यावर 12 महिन्याचं व्याज म्हणतं. जर, चालू आर्थिक वर्षात तुम्ही काही रक्कम काढली तर ती वजा करुन व्याज मोजलं जातं.

उदा. 31 मार्च  2025 ला तुमच्या खात्यातील शिल्लक 5 लाख रुपये आहे. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तुम्ही 1 लाख रुपये काढले तर पूर्ण वर्षाचं व्याज 4 लाख रुपयांवर मिळेल.  4 लाख x 8.25  टक्के यानुसार 33 हजार रुपये व्याज मिळेल.

नियम 2 : आर्थिक वर्षात काढलेल्या रकमेवरील व्याज

जर तुम्ही आर्थिक वर्षात पीएफ खात्यातून पैसे काढले असतील तर तुम्हाला 1 एप्रिल पासून रक्कम काढण्यापूर्वीच्या महिन्यापर्यंतच्या शिल्लक रकमेवर व्याज मिळतं. उदा. 20 नोव्हेंबर 2025 ला तुम्ही 1 लाख रुपये काढले. तर तुम्हाला 1 एप्रिल 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीचं व्याज मिळेल. 100000x 8.25 टक्के x 7/12 = 4812.5 रुपये व्याज मिळेल.

नियम 3 : आर्थिक वर्षात जमा झालेल्या नव्या रकमेवरील व्याज

आर्थिक वर्षात ईपीएफ खात्यात नवी रक्कम जमा होती तेव्हा ती नव्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आर्थिक वर्षाची शेवटची तारीख म्हणजे 10 एप्रिल 2025 एखाद्याच्या खात्यात 20000 हजार रुपये जमा झाल्यास व्याज 1 मे 2025 पासून 31 मार्च 2026 पर्यंत व्याज मिळेल.   20 हजारांवर 8.25 टक्क्यांनुसार 1512.5 रुपये मिळेल.

नियम 4 : व्याजाची रक्कम जितकी होते, त्याचं राऊंड ऑफ केलं जातं. म्हणजेच व्याजाची रक्कम 69399.50 रुपये असेल तर 69400 रुपये करुन व्याज दिलं जातं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.