पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये
नवी दिल्ली : काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीडस या टीमनं द हंड्रेड 2026 च्या ऑक्शनमध्ये अबरार अहमदला संघात घेतलं आहे. द हंड्रेड लीगमध्ये सनरायजर्स लीडसनं खरेदी केलेला खेळाडू अबरार अहमद हा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. द हंड्रेड मध्ये आयपीएलशी संबंधित संघांच्या फ्रँचायजीकडून पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावली जाणार नसल्याची चर्चाहोती. मात्र, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही.
अबरार अहमदला सनरायजर्स लीड्सनं 190000 पौंड म्हणजेच जवळपास 2.34 कोटी रुपयांना खरेदी केलं. पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याच्यावर सुरुवातीला ट्रेंट रॉकेटसनं बोली लावली होती. त्यांनी अबरार अहमदसाठी एक लाख पौंड इतकी बोली लावली होती. यानंतर सनरायजर्स लीडसनं 190000 पौंड बोली लावत अबरार अहमदला संघात घेतलं.
अबरार अहमदची भारतीय सैन्याबाबत वादग्रस्त कृती
ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा म्हणजेच गेल्या वर्षी मे महिन्यात अबरार अहमद यानं भारतीय सैन्याबाबत वादग्रस्त कृती त्यानं केली होती. अबरार अहमद यानं भारतीय हवाई दलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हा पाकिस्तानी हवाई दलाच्या ताब्यात होता त्या घटनेचा वापर करत टीका केली होती. अबरार अहमदला सनरायजर्स लीडसनं खरेदी करताच भारतीय चाहत्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर सनरायजर्स लीडसच्या निर्णयावर टीका केली जात आहे.
अबरार अहमद यानं पाकिस्तानसाठी 46 कसोटी, 28 एकदिवसीय सामने आणि 52 टी 20 सामने खेळले आहेत. नुकत्याच संपलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्ध 23 धावा देत 3 विकेट घेतल्या होत्या.
सनरायजर्स लीडसची संपूर्ण मालकी कलानिथी मारण आणि काव्या मारण यांची आहे. या संघाचं पूर्वीचं नाव नॉर्दन सुपरचार्जर्स होतं.
पाकिस्तानच्या हॅरिस राऊफ, सैम अयूब आणि शादाब खान यांना कोणत्याही संघानं खरेदी केलं नाही. तर, अबरार अहमद आणि उस्मान तारिक यांना संधी मिळाली. उस्मान तारिक बर्मिंघम फोनिक्सकडून खेळेल.
मुस्तफिजुर रहमानवारुन प्रकरण
आयपीएलच्या ऑक्शनमध्ये बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला केकेआरनं खरेदी केलं होतं. त्यावेळी बांगलादेशात आंदोलनं जोरात सुरु होती. बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर मुस्तफिजूरला आयपीएलमधून वगळावं अशी मागणी करण्यात आली होती, अखेर बीसीसीआयच्या आदेशानं केकेआरनं मुस्तफिजूर रहमानला वगळलं होतं. केकेआरनं त्याला ऑक्शनमध्ये 9.20 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.
हेडिंग्ले येथे अबरार, लवकरच 👏
[Play With Fire | SunRisers Leeds] pic.twitter.com/Yqm204j091
— सनरायझर्स लीड्स (@sunrisersleeds) १२ मार्च २०२६
आणखी वाचा
Comments are closed.