गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्याने घेतली लाच, व्हिडिओ व्हायरल, CEO कडून निलंबन

जालना क्राईम न्यूज : जालन्यातील जाफराबाद पंचायत समिती कार्यालयात देयक मंजूर करण्यासाठी गट विकास अधिकाऱ्यांसमोर विस्तार अधिकाऱ्याने पैसे घेतल्याची घटना घडली आहे. विस्तार अधिकारी बी ए चव्हाण यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पैसे घेणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याचं जिल्हा परिषदेच्या सीईओनी निलंबन केलं आहे. जाफराबाद तालुक्यातील डोनगाव येथील 15 वा वित्त आयोगाअंतर्गत केलेल्या कामाची देयक मंजूर करण्यासाठी पैसे घेतले आहेत.

गटविकास अधिकाऱ्यासमोर विस्ताराधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर

जालना  जिल्ह्यातील जाफराबाद येथे वित्त आयोगाअंतर्गत केलेल्या कामाची देयक मंजूर करण्यासाठी चक्क पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यासमोर विस्ताराधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कार्यालयातच लाचखोरीचा हा व्हिडिओ समोर आल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान पैसे घेणाऱ्या बी ए चव्हाण यांचे जिल्हा परिषदेच्या सीईओनी निलंबन केलं आहे. जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील 15 व्या वित्त आयोगांतर्गत नाली बांधकाम आणि सभागृहातील फरशी बांधकाम केलेल्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यासमोरच विस्तार अधिकाऱ्यांनी पैसे स्वीकारले होते. पैसे स्वीकारतानाचा व्हिडिओ तीन दिवसापासून समाज मध्यवर्ती व्हायरल होत आहे, दरम्यान या व्हिडिओ ची दखल घेत  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित विस्तार अधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.