अमेरिकेत पत्नीची हत्या करून भारतीय नागरिक पळून गेला, सरकारने 1 मिलियन डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले

न्यूयॉर्क: अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप असलेल्या भारतीय नागरिकाची माहिती देणाऱ्याला US$ 1 मिलियनचे इनाम जाहीर केले आहे. यापूर्वी या आरोपीवर २.५ लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. भद्रेशकुमार चेतनभाई पटेल (35) याच्यावर 12 एप्रिल 2015 रोजी हॅनोवर, मेरीलँड येथे पत्नी पलक पटेल (21) हिची चाकूने अनेक वेळा वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना दोघेही काम करत असलेल्या दुकानात घडली.
एका रात्री उशिरा पटेलने स्टोअरच्या मागील खोलीत आपल्या पत्नीवर अनेक वेळा वार केले आणि नंतर मागच्या दारातून पळ काढला, असे तपासकर्त्यांचे मत आहे. आरोपीला अखेरचे न्यू जर्सीच्या नेवार्क भागात पाहिले होते. FBI च्या 10 मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीत भद्रेशकुमारचा समावेश आहे. फेडरल एजन्सीने मंगळवारी जाहीर केले की जो कोणी आरोपीला पकडण्यात मदत करेल त्याला आता यूएस $ 1 मिलियनचे बक्षीस दिले जाईल. सुरुवातीला एफबीआयने पटेलबद्दल माहिती देणाऱ्याला एक लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते, जे नंतर वाढवून अडीच लाख डॉलर करण्यात आले.
Comments are closed.