Icecream : स्ट्रेस रिलीफ ते वेट लॉस… वाचा आईस्क्रीम खाण्याचे फायदे
उन्हाळा सुरु झाला असून उष्णतेत वाढ होत आहे. या उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी थंड पेय, आईस्क्रीम खाल्ले जाते. आईस्क्रीम या दिवसातील उष्ण वातावरणात शरीराला थंड ठेवण्यास मदत करते. त्यामुळे आईस्क्रीम लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच आवडीने खातात. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आईस्क्रीम खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे होतात.
वेट लॉससाठी उपयुक्त
आईस्क्रीम खाल्ल्यामुळे वेट लॉस होण्यास मदत होते. आईस्क्रीममधील व्हिटॅमिन बी-2 आणि बी-12 मेटाबॉलिझम संतुलित ठेवतो आणि बी-12 वजन कमी करण्यास फायदेशीर आहे.
थकव्यावर फायदेशीर
स्ट्रेस, दगदग यामुळे थकवा जाणवत असेल तर आईस्क्रीम नक्की खायला हवी. शरीरातील थकवा दूर होण्यासाठी एक कप आईस्क्रीमचे सेवन करणे फायदेशीर आहे. दुधामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियमचे घटक असल्यामुळे थकवा येत नाही.
मजबूत हाडे
आईस्क्रीम दुधापासून बनवण्यात येते. दुधामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असते. कॅल्शियमच्या सेवनामुळे हाडे मजबूत होतात. शरीरात उपस्थित 99 टक्के कॅल्शियम हे हाडांमध्येच असते. त्यामुळे दुधाची आईस्क्रीम खाल्ल्याने हाडांचे आजार दूर होण्यास मदत होते.
स्किनसाठी उत्तम
दुधापासून तयार करण्यात आलेल्या आईस्क्रीममध्ये प्रोटीन असते. प्रोटीनचे सेवन केल्याने स्नायू मजबूत होतात. तसेच यामुळे हाड, स्नायू, रक्त आणि त्वचेसाठी फायदेशीर असते.
स्ट्रेसपासून मुक्तता
आईस्क्रीम खाल्ल्याने मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिनसारखे ‘फील-गुड’ हार्मोन्स मुक्त होतात, ज्यामुळे ताण कमी होतो. त्यामुळे आईस्क्रीमचा आनंद नक्की घ्यायला हवा.
टीप
आईस्क्रीममध्ये साखर आणि कॅलरी जास्त असतात, त्यामुळे त्याचे अतिसेवन करणे टाळावे. मधुमेही किंवा वजन वाढीचा त्रास असलेल्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच आईस्क्रीम खावे.
हेही वाचा – Rasgulla Benefits : रसगुल्ला खाल्ल्याने शरीराला होतात फायदे
Comments are closed.