शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा

आज शेअर बाजार: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, शुक्रवार (13 मार्च) रोजी सुरुवात नकारात्मक झाली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 हे लाल निशाणावर व्यवहार करत उघडले.

30 शेअर्सचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 590.20 अंकांनी म्हणजेच 0.78 टक्क्यांनी घसरत उघडला. दिवसाची सुरुवात सेन्सेक्सने 75,444.22 या पातळीवर केली. त्याचवेळी एनएसई निफ्टी 50 मध्येही घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 50 हा निर्देशांक 176.65 अंकांनी म्हणजेच 0.75 टक्क्यांनी घसरून 23,462.50 या पातळीवर उघडला. सकाळी सुमारे 9.20 वाजेपर्यंत सेन्सेक्स 566 अंकांच्या घसरणीसह 75,467 या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी 50 देखील 185 अंकांनी घसरून 23,453 या पातळीवर ट्रेड करत होता.

Stock Market Today: बीएसईमधील टॉप गेनर आणि लूजर

सुरुवातीला बीएसईच्या बास्केटमधील पॉवरग्रिड, एनटीपीसी, आयटीसी आणि रिलायन्स हे टॉप गेनर ठरले होते. तर टॉप लूजरमध्ये एलअँडटी, टाटा स्टील, इंडिगो, एचडीएफसी बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा या शेअर्सचा समावेश होता.

Stock Market: आशियाई बाजारांमध्येही परिणाम

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा दबाव शुक्रवारी आशियाई शेअर बाजारांवर दिसून आला. व्यवहारादरम्यान जपानचा निक्केई 225 निर्देशांक जवळपास 2 टक्क्यांनी घसरला, तर टॉपिक्स निर्देशांकात सुमारे 1.4 टक्क्यांची घसरण झाली. दक्षिण कोरियामध्ये कोस्पी निर्देशांक सुमारे 3 टक्क्यांनी खाली आला. याशिवाय हाँगकाँगच्या हँग सेंग निर्देशांकाचीही सुरुवात कमकुवत होण्याचे संकेत मिळाले.

Stock Market: गुरुवारी बाजाराची स्थिती कशी होती?

भारतीय शेअर बाजारात गुरुवार (12 मार्च) रोजीच्या व्यवहारात मोठी घसरण पाहायला मिळाली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 हे दोन्ही निर्देशांक लाल निशाणावर व्यवहार करत दिवसाची समाप्ती झाली.

सेन्सेक्स 829.29 अंकांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी घसरून 76,034.42 या पातळीवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 50 हा निर्देशांक 227.70 अंकांनी म्हणजेच 0.95 टक्क्यांनी घसरत 23,639.15 या पातळीवर स्थिरावला. बीएसई बास्केटमधील एनटीपीसी, पॉवरग्रिड, टेक महिंद्रा, रिलायन्स आणि एचसीएल टेक हे टॉप गेनर ठरले होते. तर टॉप लूजरमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती, बजाज फायनान्स, एलअँडटी आणि ट्रेंट या शेअर्सचा समावेश होता. निफ्टी 100, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी स्मॉलकॅप 100, निफ्टी आयटी आणि निफ्टी मिडकॅप 100 या निर्देशांकांतील बहुतांश शेअर्समध्ये घसरण दिसून आली. गुरुवारी झालेल्या व्यवहारात बीएसई बास्केटमधील फक्त 6 शेअर्स हिरव्या निशाणावर बंद झाले, तर 24 शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा

भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा

Comments are closed.