अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी…

काव्या मारन अबरार अहमद द हंड्रेड लीग: काव्या मारन (Kavya Maran) यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं द हंड्रेड 2026 च्या (sunrisers leeds) ऑक्शनमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा फिरकीपटू अबरार अहमद (Abrar Ahmed) याला संघात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. द हंड्रेडमध्ये आयपीएलशी संबंधित संघांच्या फ्रँचायजीकडून पाकिस्तानी खेळाडूंवर बोली लावली जाणार नसल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात तसं घडलेलं नाही. त्यामुळे काव्या मारन आणि सनरायजर्स लीड्सवर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आयपीएलमधील काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलमधून काढून टाका, अशी मागणी देखील करण्यात येत आहे. याचदरम्यान, अबरार अहमदला संघात दाखल केल्यानंतर सनरायझर्स लीड्सची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सनरायझर्स लीड्स संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरीने एक निवेदन जारी केले आहे.

अबरार अहमदला संघात घेतल्यानंतर सनरायझर्स लीड्सची पहिली प्रतिक्रिया- (sunrisers leeds react on abrar ahmed)

अबरार अहमदला संघात घेण्याच्या आपल्या निर्णयाबाबत सनरायझर्स लीड्सने एक निवेदनही जारी केले. सनरायझर्स लीड्स संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरीने (Daniel Vettori) म्हटलं की, अबरार अहमदच्या गोलंदाजीत प्रचंड विविधता आहे. तसेच इंग्लंडमधील स्थानिक खेळाडूंनी यापूर्वी कधीही त्याचा सामना केलेला नाही. लिलावात उपलब्ध असलेल्या प्रत्येक खेळाडूसाठी बोली लावण्यासाठी आम्ही पूर्ण तयारीने उतरलो होतो. जेव्हा हा पर्याय आमच्यासाठी उपलब्ध झाला, त्यावेळी अनेक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिरकी गोलंदाज संभाव्य निवडीसाठी उपलब्ध होते. परंतु आमची प्राथमिकता अबरार अहमदला आमच्या संघात घेणे हीच होती, असं डॅनियल व्हेटोरीने स्पष्ट केले.

काव्या मारणेने अबरार अहमदसाठी किती कोटींची बोली लावली? (काव्या मारन अबरार अहमद द हंड्रेड लीग)

अबरार अहमदला सनरायजर्स लीड्सनं 190000 पौंड म्हणजेच जवळपास 2.34 कोटी रुपयांना खरेदी केलं. पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमद याच्यावर सुरुवातीला ट्रेंट रॉकेटसनं बोली लावली होती. त्यांनी अबरार अहमदसाठी  एक लाख पौंड इतकी बोली लावली होती. यानंतर सनरायजर्स लीडसनं 190000 पौंड बोली लावत अबरार अहमदला संघात घेतलं.

उस्मान तारिक्वाराही म्हणाले – (काव्या मारन अबरार अहमद द हंड्रेड लीग)

‘द हंड्रेड’च्या लिलाव यादीमध्ये एकूण 13 पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होता. त्यापैकी केवळ दोन खेळाडूंसाठी बोली लावली गेली. अबरार अहमदव्यतिरिक्त, ‘मिस्ट्री स्पिनर’ उस्मान तारिकसाठीही बोली लावली गेली होती. अखेरीस, उस्मानला बर्मिंगहॅम फिनिक्स (Birmingham Phoenix) या फ्रँचायझीने आपल्या संघात घेतले. त्या फ्रँचायझीचा भारताशी कोणताही संबंध नाही. शाहीन आफ्रिदीने यापूर्वीच आपले नाव या लिलावातून मागे घेतले होते.

अबरार अहमदची कारकीर्द – (काव्या मारन अबरार अहमद द हंड्रेड लीग)

27 वर्षीय अब्रार अहमदने पाकिस्तानसाठी 38 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 52 विकेट्स आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, त्याने 6.67 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. त्याच्या एकूण टी-20 क्रिकेट कारकिर्दीचा विचार करता, त्याने 84 सामन्यांमध्ये 109 विकेट्स पटकावल्या आहेत.

संबंधित बातमी:

Abrar Ahmed : पाकिस्तानी अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या सनरायजर्स लीडसनं मोजले 2.34 कोटी रुपये, द हंड्रेड लीगमध्ये खेळणार

आणखी वाचा

Comments are closed.