शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी निघाला अन्….; मोबाइलवर बोलत ड्रायव्हरनं सिमेंट मिक्सरखाली चिरड
पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये मोबाइलवर बोलत असलेल्या चालकाने सिमेंट मिक्सरच्या धडकेने सायकलवरून जाणाऱ्या शाळकरी मुलाचा चिरडलं, या घटनेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Pune Accident News) झाला. ही घटना चिंचवड येथे एसकेएफ कंपनीजवळ काल (गुरुवारी दि. १२ मार्च) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. पिंपरी चिंचवड येथील अपघातात फारूक उर्फ रेहान शकील तांबोळी (वय १५, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे मृत्यू (Pune Accident News) झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील शकील तांबोळी यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मिक्सरचालक निवृत्ती उद्धव गिरी (३९, रा. आळंदी) याला पोलिसांनी अटक केली. फारूकचे वडील खासगी कंपनीत नोकरीला असून आई गृहिणी आहे. त्याला दोन वर्षांचा भाऊ आहे. नववीत शिकत असलेला फारूक गुरुवारी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होता. एसकेएफ कंपनीजवळ पाठीमागून आलेल्या मिक्सरने त्याला धडक दिली. मिक्सरचा चालक मोबाइलवर बोलत असताना हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Accident News)
शहरातील रस्त्यांवर अवजड वाहनांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठरवून दिलेल्या वेळेबाहेरही काही ट्रक, डंपर आणि सिमेंट मिक्सर शहरात येत असल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर वेगमर्यादा न पाळणे आणि बेशिस्तपणे वाहन चालवणे यामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.(Pune Accident News)
पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
तर या अपघाताबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक दत्ता चासकर यांनी सांगितले की, प्रेमलोक पार्क जवळून खंडोबा माळी परिसरात चाफेकर चौकाकडे एक आरएमसी ट्रक अर्थात डंपर चालला होता, त्याचवेळी डंपरच्या पुढे सायकलवरून जाणाऱ्या चौदा ते पंधरा वर्षांचा मुलगा फारुक शकील तांबोळी असं त्याचं नाव आहे. पाठीमागून आरएमसी ट्रकने धडक दिली. आरएमसी चालकाला ताब्यात घेतलं आहे. त्याचा ट्रक देखील ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. चालकाला पोलिस स्टेशनला नेण्यात आलं आहे, त्याचा तपास सुरू आहे. साडेबाराच्या आसपास ही घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.(Accident News)
मुलाचे नाव फारुक शकील तांबोळी असं आहे. तो इयत्ता नववीमध्ये आहे. ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. योग्य कारवाई सुरू आहे. अशा डंपरला शहरात येण्यासाठी काही काळ ठरवून दिलेला आहे. आपल्याकडे १२ वाजल्यानंतर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. हा अपघात साडेबारा वाजण्याच्या आसपास घडला आहे, त्यामुळे ते प्रतिबंध वेळेत घडले आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहोत.(Accident News)
डंपरने सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडले, जागीचं मृत्यू. संतापजनक दृश्य सीसीटीव्हीत कैद#क्राइमन्यूज #अपघाताच्या बातम्या #पिंपरीचिंचवड pic.twitter.com/6oBbrNoil8
— अंकिता शांतीनाथ खाणे (@KhaneAnkita) १२ मार्च २०२६
आणखी वाचा
Comments are closed.