आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये

Blessing Muzarabani PSL बाहेर काढली KKR IPL 2026 मध्ये सामील झाली: पाकिस्तानची पुन्हा एकदा जगभरात नाचक्की झाली आहे. झिम्बाब्वेच्या एका खेळाडूने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान सुपर लीग (PSL) यांची खिल्ली उडवली आहे. या खेळाडूने पीएसएलमध्ये खेळण्यास नकार देत स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. आता तो भारतात खेळताना दिसणार आहे.

पाकिस्तानची नाचक्की केली

हा खेळाडू आता जगातील सर्वात चर्चेत असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळताना दिसणार आहे. हा खेळाडू म्हणजे झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानी (Blessing Muzarabani News). भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. आता तो आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसणार आहे.

आयपीएल 2026 मध्ये ब्लेसिंग मुजरबानीची एन्ट्री (Blessing Muzarabani Join KKR IPL 2026)

आयपीएलच्या या हंगामात मुजरबानी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना दिसणार आहे. तो बांगदेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानची (Blessing Muzarabani replacement for Mustafizur Rahman) जागा घेणार आहे. मोठ्या वादांनंतर बीसीसीआय आणि केकेआरने मुस्तफिजुर रहमानला आयपीएल 2026 मधून बाहेर काढले होते. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर भारतात बांगलादेशशी कोणतेही संबंध ठेवू नयेत अशी मागणी जोर धरू लागली. याच पार्श्वभूमीवर आयपीएल 2026 मधून मुस्तफिजुर रहमानला बाहेर करण्यात आले. त्यामुळे शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघात त्याच्या जागी आता ब्लेसिंग मुजरबानी खेळताना दिसणार आहे.

टी-20 विश्वचषकात दमदार कामगिरी

नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत मुजरबानीने झिम्बाब्वेकडून उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत त्याने एकूण 13 विकेट्स घेतल्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला. तसेच गट टप्प्यात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झिम्बाब्वेला मिळालेल्या ऐतिहासिक विजयांमध्ये त्याच्या गोलंदाजीची मोठी भूमिका होती. त्याने ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य फलंदाजांविरुद्ध केवळ 17 धावा देत 4 विकेट्स घेतल्या होत्या.

ब्लेसिंग मुजरबानीची शानदार आकडे

झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ब्लेसिंग मुजरबानीला मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लुंगी एन्गिडीच्या रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतले होते. मात्र त्या वेळी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आतापर्यंत त्याने 89 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांतील 86 डावांमध्ये 21.34 च्या सरासरीने 106 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 7.24 इतका राहिला आहे, जो या फॉरमॅटमध्ये खूप चांगला मानला जातो.

हे ही वाचा –

Aniruddhacharya on Abrar Ahmed : अबरार अहमदला संघात घेताच अनिरुद्धाचार्य संतापले, म्हणाले, काव्या मारनने दिलेल्या पैशांनी….

आणखी वाचा

Comments are closed.