पाकिस्तान-बांगलादेश सामन्यात चिडाचिडी अन् रडारडी, कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO

सलमान अली आगा रन आऊट बॅन विरुद्ध पाक 2रा एकदिवसीय: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील (Bangladesh vs Pakistan 2nd ODI) तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात एक असा क्षण पाहायला मिळाला, ज्यामुळे मैदानावर गोंधळ निर्माण झाला. पाकिस्तानचा फलंदाज सलमान अली आगा (Salman Ali Agha) अत्यंत विचित्र पद्धतीने रनआउट झाला आणि त्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सलमान आगासोबत नेमक काय ग़डलं? (सलमान अली आगा रन आऊट बॅन विरुद्ध पाक दुसरी वनडे)

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 47.3 षटकांत सर्वबाद 274 धावा केल्या. मात्र पाकिस्तानच्या डावात सलमान आगाचा रनआउट हा सर्वात चर्चेचा विषय ठरला. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानी डावातील 39व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ही घटना घडली. त्या वेळी मेहदी हसन मिराज गोलंदाजी करत होता, तर मोहम्मद रिजवान स्ट्राईकवर फलंदाजी करत होता. रिजवानने चेंडू हलकासा पुश केला, त्यामुळे चेंडू गोलंदाजाच्या दिशेने परत जात होता.

कधीही न पाहिलेला रनआऊट VIDEO

दरम्यान, नॉन-स्ट्रायकर एंडवर उभा असलेला सलमान आगा क्रीजच्या बाहेर होता. चेंडू सलमानच्या बॅटला लागून मेहदी हसनच्या हातात गेला. त्या क्षणी दोघांमध्ये धडकही झाली. सलमानला वाटले की चेंडू आता खेळात राहिलेला नाही, त्यामुळे तो चेंडू उचलण्यासाठी खाली वाकला. मात्र त्याआधीच मेहदी हसनने चेंडू उचलून थेट स्टंप्सवर फेकला आणि रनआउटची अपील केली. नियमांनुसार तिसऱ्या पंचांनी सलमान आगाला बाद घोषित केले.

सलमान आगा संतापला….

हा निर्णय लागल्यानंतर सलमान काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की बांग्लादेशी खेळाडूंनी दाखवलेल्या खेळभावनेबद्दल तो नाराज आहे. बाद ठरल्यानंतर संतापलेल्या सलमानने आधी हातातील ग्लोव्हज काढून फेकले आणि नंतर हेल्मेटही जमिनीवर आपटले.

इतक्यावरच तो थांबला नाही. ड्रेसिंग रूमकडे परतताना त्याने बॅट आणि हेल्मेट पुन्हा जमिनीवर आपटले आणि जोरात ओरडत आपला राग व्यक्त केला. दरम्यान, सलमान परतत असताना पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिजवान यालाही बांगलादेशच्या खेळाडूंशी मैदानावर वाद घालताना पाहण्यात आले.

हे ही वाचा –

Blessing Muzarabani News : आधी टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला रडवलं, आता पाकिस्तानची नाचक्की केली; PSL लाथ मारत IPL मध्ये धुमाकूळ घालणार पठ्ठ्या

आणखी वाचा

Comments are closed.