ना चेहऱ्यावर भीती, ना युद्धाचा ताण; तेहरानच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरताना दिसले इराणचे राष्ट्रपती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इस्रायल आणि अमेरिका यांच्यासोबत सुरू असलेल्या अत्यंत तणावाच्या परिस्थितीतही इराणच्या नेतृत्वामध्ये कोणताही घाबरटपणा दिसून येत नाहीये. इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियान तेहरानच्या रस्त्यांवर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे फिरताना दिसल्याने जगभरात याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे युद्धाचे ढग गडद होत असताना इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे हे रिलॅक्स रूप बरेच काही सांगून जाणारे आहे.

इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये आणि व्हिडीओंमध्ये हे दिसून आले की, सर्वोच्च नेते तेहरानच्या मध्यवर्ती भागात कोणत्याही विशेष सुरक्षा ताफ्याशिवाय किंवा अत्यंत मर्यादित सुरक्षेत फिरत होते. त्यांनी तेथील स्थानिक दुकानदारांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या चेहऱ्यावर युद्धाचा कोणताही ताण किंवा इस्रायलच्या संभाव्य हल्ल्याची भीती दिसून आली नाही.

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हे इराणचे एक प्रकारचे मानसिक युद्ध (Psychological Warfare) असू शकते. जगाला आणि विशेषतः आपल्या शत्रू राष्ट्रांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे की, इराण कोणत्याही हल्ल्याला घाबरत नाही आणि देशातील परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. या कृतीतून इराण आपल्या जनतेचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे.

Comments are closed.