सनरायझर्स लीड्सचा ‘अबरार’ निर्णय वादाच्या भोवऱ्यात, सनरायझर्स लीड्सचा ‘अबरार’ निर्णय वादाच्या भोवऱ्यात
द हंड्रेड लीगच्या लिलावात सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला करारबद्ध केल्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. या निर्णयामुळे फ्रेंचायजीझने जणू स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारली असल्याची टीका होत असून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
या वादावर प्रतिक्रिया देताना बीसीसीआयनेही आपली भूमिका स्पष्ट केली. हा करार परदेशातील लीगशी संबंधित असल्याने बोर्डाला त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे मत उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मांडले. हा निर्णय पूर्णपणे फ्रेंचायजीझचा आहे. त्यामुळे त्याचे परिणामही त्यांनाच भोगावे लागतील, असाही इशारा शुक्ला यांनी नकळतपणे दिला.
या करारामुळे अबरार अहमद हा हिंदुस्थानी मालकीच्या संघाने करारबद्ध केलेला पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरला आहे. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळला आहे. या टीकेमुळे अबरारचा करार राहतो की फरार होतो, हे काही दिवसांत कळेलच. दरम्यान, सनरायझर्स लीड्सच्या सहमालक काव्या मारन यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू झाली आहे.
Comments are closed.