गिरगाव चॅम्पियन्स लीगचा आजपासून थरार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण मुंबईतील क्रिकेटप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरलेली गिरगाव चॅम्पियन्स लीग (जीसीएल) स्पर्धा 14 व 15 मार्च रोजी रंगणार असून गिरगाव परिसरात क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. गिरगाव बॉईज आणि युवा व्हिजनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दक्षिण मुंबईचे माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सुरू केलेल्या या स्पर्धेची परंपरा यंदाही कायम ठेवत त्यांचे चिरंजीव आणि युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेत टेनिस क्रिकेटमधील नामांकित खेळाडूंसह मुंबईच्या रणजी संघातील काही खेळाडू आणि माजी हिंदुस्थानी क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत. 15 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता मुंबई पोलीस विरुद्ध वाहतूक पोलीस यांच्यात विशेष प्रेक्षणीय सामना खेळविला जाणार आहे.

Comments are closed.